शारजा: राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघामध्ये आजचा सामना रंगणार आहे. शारजामध्ये आतापर्यंत धावांचे पीक आलेले पाहायला मिळालेले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. दिल्लीच्या संघाकडून आज अजिंक्य रहाणे खेळताना पाहाययला मिळणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. पण आजच्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये नेमके कोणते बदल होऊ शकतात, पाहा…

दिल्लीच्या संघाने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. या पाच सामन्यांमध्ये त्यांनी चार सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत, त्यामुळे गुणतालिकेत ते दुसऱ्या स्थानावर आहेत. दिल्लीची सालमी पृथ्वी साव आणि शिखर धवन करत आहेत. त्यामुळे अजिंक्यला आजच्या सामन्यात संधी मिळणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या संघात अजून कोणते महत्वाचे बदल होणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल. दिल्लीचा संघ सध्याच्या घडीला दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे या सामन्यात त्यांनी मोठा विजय मिळवला तर त्यांना अव्वल स्थानावर पोहोचण्याची नामी संधी असेल.

राजस्थानचा संघ सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये चांगल्या फॉर्मात होता. पण त्यानंतर त्यांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, राहुल टेवाटिया यांना कामगिरीमधअये सातत्या राखता आलेले नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजीमध्ये नेमका कोणता बदल होतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल. च्याबरबोर गोलंदाजीमध्ये या सामन्यात टॉम करनऐवजी डेव्हिड मिलरला संधी मिळू शकते, असेही म्हटले जात आहे. हा सामना जर राजस्थानच्या संघाने जिंकला तर नक्कीच गुतालिकेत त्यांना चांगली झेपही घेता येऊ शकते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here