शारजा: भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर हे काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत राहिलेले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी विराट कोहील आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावर टीका केली होती. पण आता एक चाहता गावस्कर यांना ट्रोल करायला गेला आणि त्यानंतर तो तोंडावरच आपटल्याचे पाहायला मिळाले. कारण एका खेळाडूने या चाहत्याची बोलतीच बंद केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या चाहत्याला माफी मागावी लागल्याचेही पाहायला मिळाले आहे.

गावस्कर यांचे समालोचन आणि टीका सर्वच गंभीरपणे घेतात. पण सोशल मीडियावर एका चाहत्याने गावस्कर यांना ट्रोल करायचा प्रयत्न केला. गावस्कर एकदा मैदानात आयपीएलचे समालोचन करत होते. त्यावेळी गावस्कर यांच्याबरोबर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन होता. पीटरसन हा उंचपुरा खेळाडू आहे, पण गावस्कर यांची शारीरिक उंची नक्कीच पीटरसन एवढी नाही. त्यामुळे समालोचन करताना गावस्कर त्याच्याबरोबर उंची जुळवून घेण्यासाठी एका बॉक्सवर उभे राहायल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीवरून एकाच चाहत्यांना गावस्कर यांना ट्रोल केले. गावस्कर यांच्या उंचीबाबत या चाहत्याने एक कमेंट केली आणि ती त्याला चांगलीच महागात पडल्याचे पाहायला मिळाले.

या चाहत्याने सौराष्ट्रचा क्रिकेटपटू शेल्डन जॅक्सनने चांगले उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शेल्डनने एक ट्विट केले. या ट्विटमध्ये तो म्हणाला की, ” गावस्कर यांची शारीरिक उंची भलेही छोटी असेल पण त्यांनी एक क्रिकेटपटू म्हणून देशासाठी बरेच काही केले आहे. ज्यांची उंची जास्त आहे त्या व्यक्तींना जे जमले नाही ते गावस्कर यांनी भारतासाठी केले आहे. त्यामुळे तुमच्या कमेंटमध्ये भरपूर नकारात्मकता आहे. त्यामुळे सकारात्मक होण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा.”

जॅक्सनने असे उत्तर दिल्यावर त्या चाहत्याने माफी मागितली आहे. हा चाहता म्हणाला की, ” मला गावस्कर यांना दुखावण्याचा कोणताच हेतू नव्हता. पण आता माझी चूक मला समजली आहे. त्यामुळे मी त्यांची माफी मागतो. त्याचबरोबर मी त्यांच्याबाबत केलेले ट्विटही मी डिलीट करून टाकत आहे.” त्यानंतर जॅक्सनने, तुम्ही खरे क्रिकेटप्रेमी आहात, असे या चाहत्याला म्हटल्याचे पाहायला मिळाले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here