या सामन्यापूर्वी दिल्लीचा संघ पाच सामने खेळला होता. या पाच सामन्यांमध्ये दिल्लीने चार विजय मिळवले होते, तर एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यापूर्वी दिल्लीचा संघ दुसऱ्या स्थानावर होता. आज दिल्लीने राजस्थानवर मोठा विजय मिळवला. या विजयानंतर दिल्लीच्या संघाने अव्वल स्थानावर झेप घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण या विजयानंतर दिल्लीच्या संघाचे १० गुण झाले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये १० गुण पटकावणारा दिल्ली हा पहिला संघ ठरला आहे. यावेळी दिल्लीच्या संघाने मुंबई इंडियन्सला धक्का दिल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण यापूर्वी मुंबईचा संघ आठ गुणांसह अव्वल स्थानावर होता. दिल्लीचे या सामन्यात १० गुण झाले असून त्यांनी मुंबईकडून गुणतालिकेतील अव्वल स्थान आपल्याकडे घेतले आहे. त्यामुळे गुणतालिकेत मुंबईचा संघ आता दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे मुंबईचा संघ पुन्हा अव्वल स्थान कधी मिळवणार, याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना नक्कीच असेल.
या सामन्यापूर्वी राजस्थानच्या संघाने पाच सामने खेळले होते. या पाच सामन्यांमध्ये राजस्थानने दोन विजय मिळवले होते, तर तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे राजस्थानचा संघ चार गुणांसह सातव्या स्थानावर होता. राजस्थानचा संघ आजही पराभूत झाला. हा त्यांचा स्पर्धेतील चौथा पराभव होता. या पराभवानंतर राजस्थानचा संघ सातव्याच स्थानावर राहीलेला आहे. पण त्यांच्या नेट रनरेट मात्र चांगलाच घसरल्याचे पाहायला मिळाले आहे.
गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावक सनरायझर्स हैदराबादचा संघ आहे, त्याचबरोबर चौथ्या स्थानावर कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आहे. गुणतालिकेत पाचव्या स्थानावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ सध्याच्या घडीला सहाव्या स्थानावर आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times