दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला चांगली सुरुवात मिळाली नाही. राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर (१३) मोठी खेळी साकारू शकला नाही. बटलर बाद झाल्यावर राजस्थानचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि यशस्वी जैस्वाल यांची चांगली भागीदारी पाहायला मिळाली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी रचली. पण स्मिथला यावेळी दिल्लीचा वेगवान गोलंदाज एनरीच नॉर्टजेने बाद केले आणि ही जोडी फुटली. स्मिथला यावेळी २४ धावा करता आल्या.
स्मिथ बाद झाल्यावर जैस्वाल मोठी खेळी साकारेल, असे वाटत होते. कारण तो चांगलाच स्थिरस्थावर झाला होता. पण मोठा फटका मारण्याच्या नादात जैस्वाल ३४ धावांवर बाद झाला. जैस्वाल बाद झाल्यावर राजस्थानच्या अन्य फलंदाजांना जास्त काळ फलंदाजी करता आली नाही आणि त्यांच्या पदरी पराभव पडला.
शारजाच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडतो, असे आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. पण राजस्थान रॉयल्सच्या अचूक गोलंदाजीपुढ दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाज अपयशी ठरलेले पाहायला मिळाले. जोफ्रा आर्चरने दिल्लीला सुरुवातीला दोन धक्के दिले. त्याचबरोबर दिल्लीचे दोन फलंदाज धावचीत झाले. त्यामुळे दिल्लीच्या संघाला यावेळी राजस्थानपुढे मोठे आव्हान ठेवता आले नाही. दिल्लीने यावेळी राजस्थानला विजयासाठी १८५ धावांचे आव्हान ठेवले होते.
राजस्थानच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दिल्लीच्या संघाला यावेळी चांगली सुरुवात करता आली नाही. कारण त्यांचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले. शिखर धवनला यावेळी पाच धावा करता आल्या, तर पृथ्वी साव १९ धावांवर बाद झाला. रिषभ पंतने तर यावेळी धावचीत होत आत्मघात केला, त्याला पाच धावा करता आल्या.
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर यावेळी मोठी खेळी साकारणार, असे वाटत होते. पण राजस्थानच्या यशस्वी जैस्वालने यावेळी भन्नाट कामगिरी केली आणि श्रेयसला धावचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. श्रेयसला यावेळी२२ धावांवर समाधान मानावे लागले. मार्कस स्टॉइनिस आणि शेमरॉन हेटमायरल ही जोडी दिल्लीला मोठी धावसंख्या उभारून देईल, असे वाचत होते. पण मार्कसला राहुल टेवाटियाने कर्णधार स्टीव्हन स्मिथकरवी झेल बाद केले आणि ही जोडी फोडली. मार्कसला यावेळी ३९ धावा करता आल्या.
मार्कस आऊट झाल्यावर हेटमायरल दिल्लीचा धावफलत हलता ठेवण्याची जबाबदारी चोख बजावता होता. दिल्लीच्या संघाकडून यावेळी सर्वाधिक धावा या हेटमायरनेच केल्या. हेटमायरने २४ चेंडूंत एक चौकार आणि पाच षटकारांसह ४५ धावांची खेळी साकारली. आर्चरने या सामन्यात भेदक मारा करत तीन बळी मिळवले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times