कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या किंग्ज इलेव्हनसाठी या सामन्यात विजय अतिशय गरजेचा आहे. पंजाबने आतापर्यंत ६ पैकी ५ सामने गमावले आहेत आणि ते गुणतक्त्यात अखेरच्या स्थानावर आहे. पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्यांचा सुपर ओव्हरमध्ये पराभव झाला होता. त्यानंतर राजस्थानविरुद्ध २२३ धावा करून देखील पंजाबला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर मुंबई, चेन्नई आणि हैदराबादकडून पराभव झाला.
वाचा-
कोलकाताविरुद्धच्या सामन्यात पराभवाची मालिका थांबवण्याचे आव्हान पंजाबपुढे असेल. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलच्या ऐवजी ख्रिस गेलला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मॅक्सवेलने ६ सामन्यात खराब कामगिरी केली आहे. सलामीची जोडी राहुल आणि मयांक अग्रवाल यांच्यानंतर गेलला पाठवले जाऊ शकते.
या उलट कोलकाताने मुंबईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सलग तीन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांनी हैदराबाद, राजस्थान आणि चेन्नईचा पराभव केला.
वाचा-
हेड-टू-हेड
दोन्ही संघात आतापर्यंत १७ लढती झाल्या आहेत. त्यापैकी ८ मध्ये पंजाब तर ३ मध्ये कोलकाताने विजय मिळवलाय.
संभाव्य संघ
पंजाब- केएल राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, मयांक अग्रवाल, प्रभसिमरन सिंह (विकेटकिपर), निकोलस पूरन, मनदीप सिंह, मुजीबर उर रहमान, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी, शेल्डन कॉर्टेल, अर्शदीप सिंह
कोलकाता– राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, नितिश राणा, इयॉन मॉर्गन, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (कर्णधार आणि विकेटकिपर), सुनील नरेन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times