वाचा-
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे. शिखरने ५३७ चौकार मारले आहेत. तर ४९३ चौकारांसह सुरेश रैना दुसऱ्या तर गौतम गंभीर ४९१ चौकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीने आतापर्यंत ४८९ चौकार मारले आहेत.
वाचा-
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात विराटला गंभीर आणि रैनाला मागे टाकण्याची संधी आहे. यासाठी त्याला फक्त पाच चौकार मारण्याची गरज आहे. गंभीर खेळत नाही. तर रैना यावर्षी आयपीएल खेळत नाही. त्यामुळे विराटला या दोघांना मागे टाकण्याची संधी आहे.
वाचा-
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चौकार दिल्ली कॅपिटल्सच्या शिखर धवनने १६४ सामन्यात ५३७ चौकार मारले आहेत. या वर्षी आतापर्यंत धवन फॉर्ममध्ये दिसला नाही. त्याने ६ सामन्यात फक्त २२च्या सरासरीने १३२ धावा केल्या आहेत.
वाचा-
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज
१] शिखर धवन- ५३७
२] सुरेश रैना- ४९३
३] गौतम गंभीर- ४९१
४] विराट कोहली- ४८९
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times