दुबई, , : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला आतापर्यंत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पण चेन्नईच्या संघात इम्रान ताहिरसारखा अनुभवी फिरकीपटू आहे. पण तरीही त्याला अजून संघात संधी मिळालेली नाही. कॅरेबियन लीग गाजवून आलेल्या इम्रान ताहिरसारख्या अनुभवी फिरकीपटूला चेन्नईच्या संघाने एकदाही संघात खेळवलेले नाही.आज चेन्नईचा सामना विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाबरोबर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात तरी ताहिरला संधी मिळणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

चेन्नईच्या संघात यापूर्वी फिरकीपटू म्हणून पीयुष चावलाला संधी दिली होती. पण गेल्या सामन्यात चेन्नईच्या संघात कर्ण शर्मा या भारताच्या फिरकीपटूला संधी देण्यात आली होती. कर्णने या सामन्यात दोन विकेट्स मिळवून संधीचे सोने केले होते. त्यामुळे जर ताहिरला संघात संधी द्यायची असेल तर त्यांना पीयुष आणि कर्ण या दोघांनाही वगळावे लागू शकते. त्यामुळे ताहिरला चेन्नईच्या संघात संधी मिळू शकत नाही, हे एक कारण आहे.

ताहीरला संधी का मिळत नाही, यााबबतचे दुसरे कारण म्हणजे संघातील परदेशी खेळाडू. सध्याच्या घडीला चेन्नईच्या संघातून शेन वॉटसन, फॅफ ड्यू प्लेसिस, ड्वेन ब्राव्हो आणि सॅम कुरन असे चार परदेशी खेळाडू आहेत. एका संघात चार परदेशी खेळाडूंनी खेळवण्याची मुभा आहे. सध्याच्या घडीला या चौघांकडूनही चांगली कामगिरी झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे ताहिरला जर संघात घ्यायचे असेल तर त्यांना एका परदेशी खेळाडूला बाहेर बसवावे लागेल. पण या चौघांपैकी कोणत्या खेळाडूला संघाबाहेर बसवायचे हा चेन्नईपुढे मोठा प्रश्न असेल.

आयपीएलमध्ये आज महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जची कसोटी लागणार आहे. CSKची लढत विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध होत आहे. चेन्नईला कोणत्याही परिस्थितीत कामगिरीत मोठी सुधारणा करावी लागणार आहे. आणखी एक पराभव चेन्नईच्या पुढील वाटचाली अडचणीत आणणाऱ्या ठरू शकतील. स्पर्धेत आतापर्यंत चेन्नईला ६ सामन्यात फक्त दोन विजय मिळवता आले. ते गुणतक्त्यात ६व्या स्थानावर आहेत. तर बेंगळुरूने ५ सामन्यात ३ विजयांसह पाचवे स्थान मिळवले. हे दोन्ही संघ पहिल्या टॉप ४ मधून बाहेर आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here