अबुधाबी: आयपीएलमध्ये अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा २ धावांनी ( beat by 2 runs ) पराभव केला. कोलकाताने प्रथम फलंदाजी करत ६ बाद १६४ धावा केल्या होत्या. बदल्यात पंजाबला ५ बाद १६५ धावा करता आल्या.

वाचा-

नाणेफेक जिंकून कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांची सुरुवात फार चांगली झाली नाही. पंजाबच्या गोलंदाजांनी त्यांना धावा करू दिल्या नाहीत. यामुळे १० षटकात त्यांना फक्त ६० धावा करता आल्या. यात दोन विकेट देखील कोलकाताने गमवल्या होत्या. शुभमन गिल आणि इयॉन मॉर्गन हे दोघे मोठी खेळी करतील असे वाटत होते. पण मॉर्गन २४ धावा करून बाद झाला. त्यानंतर दिनेश कार्तिक मैदानावर आला. त्याने गिल सोबत संघाला एक चांगली धावसंख्या उभी करून दिली. या दोघांनी अर्धशतक पूर्ण केले. कार्तिक आतापर्यंत धावा करण्यात अपयशी ठरला होता. त्याने २२ चेंडूत ५० धावा केल्या. अखेर कोलकाताने २० षटकात ६ बाद १६४ ही आव्हानात्मक अशी धावसंख्या उभी केली.

वाचा-
सलग चार पराभव झालेल्या पंजाबला मयांक अग्रवाल आणि कर्णधार केएल राहुल यांनी शानदार अशी सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी करून दिली. मयांक ५६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या निकोलस पूरनला सुनिल नरेनने बाद केले. १७व्या षटकापर्यंत सामन्यावर पंजाबचे नियंत्रण होते. पण कर्णधार केएल राहुल ७४ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी कोणतीही चूक केली नाही.

वाचा-
अखेरच्या षटकात विजयासाठी १४ धावांची गरज असताना पंजाबला १२ धावा करता आल्या. ग्लेन मॅक्सवेलने अखेरच्या चेंडूवर ७ धावांची गरज असताना चौकार मारला. त्याचा षटकार अवघ्या काही इंचाने हुकला. जर तो षटकार गेला असता तर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असता. पंजाबचा हा सलग पाचवा पराभव ठरला आहे. गुणतक्त्यात ते ७ पैकी ६ पराभवांसह अखेरच्या स्थानावर आहेत. तर कोलकाताने या विजयासह गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळवले आहे. KKRने ६ पैकी ४ सामन्यात विजय मिळवला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here