दुबई,
vs
: कर्णधार विराट कोहलीच्या धमाकेदार नाबाद ९० धावा आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे आरसीबीने चेन्नईवर विजय मिळवल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात कोहली आणि महेंद्रसिंग धोनी हे भारताचे आजी-माजी कर्णधार एकमेकांसमोर उभे ठाकले होते. पण या सामन्यात कोहली धोनीवर भारी पडल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी अचूक मारा केल्याचे पाहायला मिळाले. भेदक गोलंदाजीमुळेच आरसीबीला चेन्नईवर ३७ धावांनी विजय मिळवता आला.

आरसीबीच्या १७० धावांच्या पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात आश्वासक झाली नाही. शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी यावेळी सावध सुरुवात केली. पण स्थिरस्थावर झाल्यावर या दोघांनाही मोठी खेळी साकारता आली नाही. आरसीबीच्या वॉशिंग्टन सुंदरला मोठा फटका मारण्याच्या नादात या दोघांनीही आपल्या विकेट्स गमावल्या. फॅफला यावेळी आठ धावा करता आल्या, तर वॉटसनला यावेळी १४ धावांवरच समाधान मानावे लागले.

वॉटसन बाद झाल्यानंतर फलंदाजीला चेन्नईकडून पदार्पण करणारा एन. जगदीशन आला. जगदीशननेही सावध सुरुवात केली. काही मोठे फटके त्याने लगावले खरे, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. जगदीशनने यावेळी २८ चेंडूंत चार चौकारांच्या जोरावर ३३ धावा केल्या. धोनीला देखील यावेळी १० धावांवर समाधान मानावे लागले, तर सॅम करन भोपळाही न फोडता आऊट झाला. स्थिरस्थावर झालेला अंबाती रायुडू यावेळी मोक्याच्या क्षणी बाद झाला. रायुडूने ४० चेंडूंत ४२ धावा करता आल्या. आज ड्वेन ब्राव्होला पहिल्यांदा फलंदाजीची संधी मिळाली खरी, पण तोपर्यंत सामना चेन्नईच्या हातामधून निसटलेला होता.

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. एकिकडे आरसीबीचे फलंदाज अपयशी ठरत असताना कोहलीने आजच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. कोहलीच्या या दमदार अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीला चेन्नईच्या संघापुढे विजयासाठी १७० धावांचे आव्हान ठेवता आले. विराट कोहलीने यावेळी ९० धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here