दुबई: आयपीएलमध्ये काल शनिवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. स्पर्धेतील निम्मे म्हणजे सात सामने झाले आहेत आणि त्यापैकी चेन्नईला फक्त दोन सामन्यात विजय मिळवता आला आहे. स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ अशी ओळख असलेल्या चेन्नईला या वर्षी झालय तरी काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

वाचा-

बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करत चेन्नईपुढे विजयासाठी १७० धावांचे आव्हान दिले होते. पण त्यांना ३७ धावांनी पराभव स्विकारावा लागला. सामना झाल्यानंतर पराभवाबद्दल बोलताना () म्हणाला, आम्ही चांगली गोलंदाजी केली. पण अखेरच्या चार षटकात अधिक धावा दिल्या. यामुळेच बेंगळुरू १६९ धावांपर्यंत मजल मारू शकला.

गोलंदाजी करताना आम्ही अखेरच्या ४ षटकात खराब कामगिरी केली. येथे आम्ही चांगली गोलंदाजी करायला हवी होती. एक तर आम्ही सुरुवातीच्या ६ षटकात किंवा अंतिम काही षटकात धावा देत आहोत. खुप साऱ्या चुका होत आहेत. आम्हाला चांगली कामगिरी करावी लागले. पण माझ्या मते मुख्य काळजीचा विषय फलंदाजी आहे.

वाचा-

फलंदाजी चांगली होत नाही हे आज सिद्ध झाले. याबाबत आम्हाला काही तरी करण्याची गरज आहे. मला वाटते की आम्हाला दुसऱ्या पद्धतीने खेळावे लागले. भलेही तुम्ही आउट व्हाल, पण मोठे शॉट खेळावे लागतील. पुढील सामन्यात असे बदल करावे लागतील.

व्हिडिओ पाहण्यासाठी

स्पर्धेत आतापर्यंत कशी कामगिरी केली यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. सहाव्या षटकानंतर फलंदाजीत आक्रमकता थोडी कमी दिसते. मी संघातील प्रत्येक खेळाडूला सध्या सुरू असलेल्या सामन्यावर लक्ष्य ठेवण्यास सांगतो. जेव्हा तुम्ही झालेल्या मॅचबद्दल विचार करत असता तेव्हा तुमच्यावर दबाव येत असतो.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here