दुबई: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार ( ) ने काल चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात ५२ चेंडूत नाबाद ९० धावांची खेळी केली. विराटच्या या धमाकेदार कामगिरीने RCBने CSKचा ३७ धावांनी पराभव केला. विराटने चार षटकार आणि चार चौकार मारले. त्याला देवदत्त पडिक्कल (३४ चेंडूत ३३ धावा) आणि शिवम दुबे (नाबाद २२) यांची चांगली साथ मिळाली.

वाचा-

कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी चार बाद १६९ धावा केल्या. उत्तरादाखल चेन्नईला ८ बाद १३२ धावा करता आल्या. हा सामना झाल्यानंतर विराट आणि धोनीची ( M S Dhoni) भेट झाली. हे दोन्ही खेळाडू गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत अखेरचे एकत्र दिसले होते. त्यानंतर विराट आणि कालच्या सामन्यात समोरासमोर आले. विराटने धोनीला मिठी मारली.

वाचा-

विराटने नेहमीच धोनीला स्वत:चा कर्णधार मानले आहे. धोनीकडून भारतीय संघाचे नेतृत्व विराटकडे आले होते. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराटने म्हटले होते की, धोनी माझा कर्णधार आहे आणि नेहमी तोच असेल. त्याच्या निवृत्तीनंतर कोहली प्रथमच धोनीला भेटला.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोन्ही खेळाडूंचे चाहते त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. दोघांना एकत्र पाहून चाहते खुश आहे.

वाचा-

वाचा-

विराटला अद्याप आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही. या वर्षी RCBला विजेतेपद मिळवून देण्याची त्याचा प्रयत्न असेल. चेन्नईचा पराभव केल्यानंतर बेंगळुरू गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. तर चेन्नई सहाव्या क्रमांकावर आहे. दिल्ली पाच विजयांसह पहिल्या स्थानावर आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here