दुबई: आयपीएलची ३ विजेतेपद, सर्वाधिक वेळा फायनल खेळलेला संघ अशी ओळख असेलल्या () संघाला या वर्षी झालय तरी काय असा प्रश्न फक्त त्यांच्या चाहत्यांना नाही तर अन्य क्रिकेट प्रेमींना पडला आहे. चेन्नईची या वर्षाची सुरूवात तरी चांगली झाली होती. गतविजेत्या मुंबईचा पराभव करून त्यांनी आयपीएल २०२०ची सुरूवात केली. पण त्यानंतर गोष्टी बिघडतच गेल्या.

वाचा-

आयपीएलच्या १३वा हंगाम आता मध्यावर आला आहे आणि चेन्नई सुपर किंग्जने ७ पैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे.

चेन्नईचा IPLमधील आतापर्यंतचा प्रवास
१) मुंबई विरुद्ध ५ विकेटनी विजय
२) राजस्थान विरुद्ध १६ धावांनी पराभव
३) दिल्ली विरुद्ध ४४ धावांनी पराभव
४) हैदराबादविरुद्ध ७ धावांनी पराभव
५) पंजाबविरुद्ध १० विकेटनी विजय
६) कोलकाताविरुद्ध १० धावांनी पराभव
७) बेंगळुरूविरुद्ध ३७ धावांनी पराभव

काल झालेल्या सामन्यात बेंगळुरूने चेन्नीचा ३७ धावांनी पराभव केला. या पराभवासाठी धोनीने फलंदाजीला दोषी ठरवले. पण तो स्वत: आतापर्यंत चांगली फलंदाजी करू शकला नाही.

वाचा-

धोनीने चेन्नई तुलना अनेक ठिकाणी छिद्र पडलेल्या जहाजाशी केली. एक छिद्र ठीक केले की दुसऱ्यातून पाणी येते असे तो म्हणाला.

पुढची वाट अत्यंत बिकट
आयपीएल २०२० मध्ये चेन्नईचे सात सामने शिल्लक आहेत. त्यापैकी किमान पाच सामन्यात त्यांना विजय मिळवावा लागले. तरच त्यांचे १४ गुण होतील. यात देखील अन्य कोणत्या संघाचे १४ गुण झाले तर चेन्नईला सरासरी चांगली ठेवावी लागणार आहे.

वाचा-

याआधी २०१०मध्ये केला होता चमत्कार
आयपीएलमधील सर्वात ताकदीचा संघ असलेल्या चेन्नईची अशी अवस्था होण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा विजेतेपद मिळवले आहे. यातील पहिले विजेतेपद २०१० साली मिळवले होते. तेव्हा धोनीच्या चेन्नईची अवस्था आजच्या सारखीच होती. आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात चेन्नईने सुरुवातीच्या ७ पैकी ५ सामने गमावले होते. त्यानंतर त्यांनी शानदार कमबॅक केला. साखळी लढतीतमध्ये तेव्हा चेन्नईने किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव करत प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले.

सेमी फायनलमध्ये चेन्नईने डेक्कन चार्जर्सचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आणि फायनलमध्ये मुंबई इंडियन्सचा २२ धावांनी पराभव करत पहिले विजेतेपद मिळवले होते. १० वर्षापूर्वी चेन्नईने जो कमाल केला होता. तोच कमाल या वर्षी करणार का यासाठी पुढील काही सामन्यांची वाट पाहावी लागणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here