दुबई: किंग्स इलेव्हन पंजाबचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याता आहे. गेलचा हॉस्पिटलमधला एक फोटो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मी लढल्याशिवाय हरणार नाही, असेही गेलने यावेळी म्हटले आहे.

गेलने आपला हॉस्पिटलमधला फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोखाली गेलने काही कमेंट्सही केल्या आहेत. गेल यावेळी म्हणतो की, ” मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की, मी युनिवर्सल बॉस आहे. त्यामुळे मी लढल्याशिवाय हार मानणार नाही. माझ्यामधल्या काही गोष्टी कधीच बदलणार नाही. तुम्ही माझ्याकडून काही गोष्टी नक्कीच शिकू शकता, पण मी काहीही केले तरी तुम्ही त्याला फॉलो करा, असे मी म्हणणार नाही. तुम्ही आतापर्यंत मला जो पाठिंबा दिला आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार.”

पंजाबच्या संघाकडून गेलला आतापर्यंत एकही संधी मिळालेली नाही. गेलला गेल्या काही सामन्यांमध्ये संधी मिळणार होती. पण गेलचे पोट बिघडले होते त्यामुळे त्याला गेल्या दोन सामन्यांमध्ये खेळवता आले नाही. पंजाबचा संघ आतापर्यंत गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे पंजाबच्या संघालाही गेलची कमी कुठे ना कुठे तरी नक्कीच जाणवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

गेलला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात संधी मिळणार होती. त्यावेळी त्याच्या पोटामध्ये बिघाड झाला होता. यावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सांगितले होते की, ” गेलला आम्ही नक्कीच संघात स्थान देणार होतो. पण त्याचे पोट बिघडले आहे. त्यामुळे त्याला संघात स्थान देता आले नाही. पण गेल फिट झाल्यावर नक्कीच त्याचा विचार आम्ही करणार आहोत.”

पंजाबच्या संघातील कर्णधार लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल चांगली फलंदाजी करत आहे. त्यामुळे गेलला अजून संधी देण्यात आली नव्हती. पण पंजाबच्या संघाची फलंदाजीची मधली फळी कमकुवत वाटत आहे. त्यामुळे गेलला संघात स्थान दिल्यावर लोकेश आणि मयांक यांच्यापैकू एकाला नक्कीच मधल्या फळीत खेळावे लागणार आहे. हा पंजाबच्यासाठी मोठा निर्णय असेल, असेही म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here