अबुधाबी: DC vs MI () च्या १३व्या हंगामात आज होणाऱ्या डबल हेडरमधील दुसरी लढत गुणतक्त्यातील दोन अव्वल संघामध्ये म्हणजेच विरुद्ध ( vs ) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघात स्टार खेळाडू आहेत आणि त्यांनी आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे.

वाचा-

दिल्ली कॅपिटल्सने या वर्षी सर्वांना धक्का देत गुणतक्त्यात १० गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. त्यांनी ६ पैकी ५ सामने जिंकले आहेत. तर मुंबई संघ ६ पैकी ४ विजय मिळवत ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांनी याआधीचे ३ सामने जिंकले आहेत. त्यामुळे विजयाचा चौकार कोण मारणार याची उत्सुकता आहे.

वाचा-

दोन्ही संगात आतापर्यंत २४ लढती झाल्या आहेत. त्यात दोघांनी प्रत्येकी १२ लढतीत विजय मिळवला आहे. मुंबई- दिल्ली दोन्ही संघांची फलंदाजी आणि गोलंदाजी मजबूत आहे. कोणता संघ वरचढ आहे हे सांगायचे झाले तर मुंबईची गोलंदाजी अधिक अनुभवी आहे. जसप्रित बुमहार आणि ट्रेंट बोल्ट यांच्याकडे मोठा अनुभव आहे.

वाचा-

दिल्लीसाठी शिखर धवनने चांगली सुरुवात करून देणे आवश्यक आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात शिखरला मोठी धावसंख्या करता आली नाही. त्याच बरोबर पृथ्वी शॉ आणि ऋषब पंत यांची देखील परीक्षा होणार आहे. त्यांना बोल्ट आणि बुमराहचा सामना करायचा आहे. शिमरॉन हेटमेयर चांगल्या फॉर्ममध्ये परतला आहे. कर्णधार देखील चांगली फलंदाजी करत आहे. गोलंदाजीत रबाडा, अश्विन, अक्षर पटेल ही फैज आहे.

मुंबईची सर्वात मोठी ताकद म्हणजे हा संघ कोणत्या एका खेळाडूवर अवलंबून नाही. रोहीत शर्मा, डीकॉक या सलामीच्या जोडीनंतर इशान किशन, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि किरॉन पोलार्ड हे धमाकेदार फलंदाज आहेत.

अबुधाबीच्या मैदानावर १७० देखील चांगली धावसंख्या ठरू शकते. पण दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी पाहता २०० धावसंख्य देखील सुरक्षित वाटणार नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here