आबुधाबी : अजिंक्य रहाण या आपल्या हुकमी एक्क्याला दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने अखेर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात संधी दिली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात आता अजून एक मुंबईकर दिल्लीकडून खेळताना पाहायला मिळेल.

आतापर्यंतच्या सहा सामन्यांमध्ये दिल्लीच्या संघाने अजिंक्यला संधी दिली नव्हती. आज अखेर सातव्या सामन्यांत अजिंक्यला पहिल्यांदा संधी मिळाली आहे. ही संधी मुंबई इंडियन्ससारख्या बलाढ्य संघाविरुद्धच्या सामन्यात देण्यात आली आहे. यामुळे दिल्लीच्या संघातील मुंबईच्या खेळाडूंची संख्या आता वाढलेली पाहायला मिळत आहे. कारण अजिंक्यसह कर्णधार श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ हे मुंबईचे आजच्या सामन्यात खेळताना पाहायला मिळतील. दुसरीकडे मुंबईच्या संघात जेवढे मुंबईकर नाही, तेवढे दिल्लीच्या संघात असल्याचेही पाहायला मिळत आहे.

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामधील सामना आज रंगणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, त्यांना अव्वल स्थानावर जाण्याची नामी संधी असेल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा समजला जात आहे. पण या सामन्यात दोन्ही संघांकडून जास्त बदल पाहायला मिळणार नाही. मुंबईविरुद्धच्या सामन्यात मुंबईकर अजिंक्य रहाणेला संधी मिळणार का, हा सर्वात उत्सुकतेचा विषय होता. आज दिल्लीने त्याला संधी देत सर्वांनाच धक्का दिला आहे.

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आजच्या सामन्यात मुंबईचेच दोन खेळाडू कर्णधार म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकलेले पाहायला मिळणार आहे. पण या सामन्यात रोहित शर्मा बाजी मारतो की श्रेयस अय्यर यांची उत्सुकता नक्कीच चाहत्यांना असेल.

रोहितने आजच्या सामन्यात अर्धशतक झळकावले तर तो आयपीएलमधील सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा दुसरा फलंदाज ठरेल. कारण आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके ही सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहेत. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये वॉर्नरने ४६ अर्धशतके झळकावलेली आहेत.

रोहितला या आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंतच्या सहा सामन्यांमध्ये रोहितने दोन अर्धशतके लगावली आहे. आतापर्यंतच्या सहा सामन्यांमध्ये रोहितने ३५.१६ च्या सरासरीने २११ धावा केल्या आहे, याटवेळी रोहित स्ट्राइक रेट १४५.५१ एवढा आहे. त्यामुळे रोहितला सातत्यपूर्ण फलंदाजी करावी लागणार आहे. त्यामुळे आजच्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात रोहित नेमका कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here