आबुधाबी, : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईकर फलंदाजांना मोठी खेळी साकारता आल्याचे पाहायला मिळाले नाही. पण दिल्लीकर शिखर धवनने मात्र अर्धशतक झळकावले. धवनच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीला मुंबईपुढे १६३ धावांचे आव्हान ठेवता आले. शिखर धवनने यावेळी ५२ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ६९ धावांची महत्वाची खेळी साकारली.

मुंबईविरुद्धच्या सामन्यात पृथ्वी साव, संघात स्थान मिळालेला अजिंक्य रहाणे आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यापैकी कोण मोठी खेळी साकारतो, याची उत्सुकता सर्वांनाच होती. पण या तिघांपैकी एकालाही यावेळी अर्धशतकापर्यंत मजल मारता आली नाही. सामन्याच्या पहिल्याच षटकात मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पृथ्वीला बाद केले आणि दिल्लीला पहिला धक्का दिला. पृथ्वीला यावेळी चार धावाच करता आल्या.

अजिंक्य रहाणेने यावेळी चांगली सुरुवात केली खरी, पण त्याला ३ चौकारांच्या जोरावर १५ धावा करता आल्या. त्यामुळे यावेळी मोठी खेळी साकारण्यात अजिंक्यलाही अपयश आले. कर्णधार अय्यर आणि सलामीवीर शिखर धवन यांची जोडी यावेळी चांगलीच जमलेली पाहायला मिळाली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. पण अय्यरला यावेळी अर्धशतक झळकावता आले नाही. अय्यरने पाच चौकारांच्या जोरावर ३३ चेंडूंत ४२ धावा फटकावल्या.

तिन्ही मुंबईकरांना यावेळी अर्धशतक झळकावता आले नाही. पण दिल्लीकर धवनने मात्र या सामन्यात अर्धशतक झळकावले. धवनचे या आयपीएलमधील हे पहिले अर्धशतक ठरले. धवनने यावेळी मुंबईच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला.

हार्दिक आणि पंड्या बंधूंची चांगलीच जुंपली, दिल्लीला मिळाला धावांचा बोनसही गोष्ट घडली ती मुंबई इंडियन्स गोलंदाजी करत असेलल्या सातव्या षटकात. हे कृणालचे दुसरे षटक होते. पहिल्या षटकात कृणालने दिल्लीच्या अजिंक्य रहाणेला बाद केले होते. त्यानंतर आपल्या दुसऱ्या षटकातही तो चांगली गोलंदाजी करत होता. त्यावेळी या सातव्या षटकातील चौथ्या चेंडूवर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने एक फटका मारला आणि चेंडू हार्दिकच्या हातामध्ये होता. त्यावेळी श्रेयस हा एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होता आणि त्याने आपले क्रीझही सोडले होते. त्यावेळी श्रेयसला आपण धावचीत करू शकतो, असे हार्दिकला वाटले. त्यामुळे हार्दिक चेंडू पकडून कृणालकडे टाकण्याचा प्रयत्नामध्ये होता. त्यावेळी कृणालने आपल्याकडे चेंडू टाकू नको, असे ओरडून सांगितले. पण हार्दिकने यावेळी चेंडू कृणालच्या दिशेने फेकला.

हार्दिकने आपल्या दिशेने टाकलेला चेंडू पकडण्याच्या तयारीत कृणाल नव्हता. कारण यापूर्वीच त्याने तसे सांगितले होते. त्यामुळे हार्दिकने टाकलेला चेंडू हा यष्ट्यांना न लागता पुढे गेला. हा चेंडू पकडण्यासाठी कोणीही दुसरा खेळाडू तिथे नव्हता. त्यामुळे जिथे एकही धाव नव्हती, तिथे दिल्लीने दोन धावा घेतल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक आणि कृणाल यांच्या भांडणात यावेळी दिल्लीला धावांचा बोनस मिळाल्याचे पाहायला मिळाले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here