दुबई: आयपीएलच्या १३व्या हंगामात काल राजस्थान रॉयल्सने सनरायजर्स हैदराबादचा पाच विकेटनी पराभव केला. ५ बाद ७८ अशी अवस्था असाना राजस्थानकडून आणि रियान परागने ८५ धावांची भागिदारी करत संघाला सनसनाटी विजय मिळून दिला. आयपीएलमध्ये राहुल तेवतियाने दुसऱ्यांदा धमाकेदार फलंदाजी करून संगाला विजय मिळून दिला. यावेळी त्याच्या सोबतीला रियान देखील होता.

हैदराबादने प्रथम फलंदाजी करत राजस्थानपुढे विजयासाठी १५९ धावांचे आव्हान दिले होते. पण राजस्थानच्या आघाडीचे आणि मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले. बेन स्टोक्स ५, जोस बटलर १६, कर्णधार स्टीव्ह स्मिथ ५, रॉबिन उथप्पा १८ आणि संजू सॅमसन २६ धावांवर बाद झाल्यानंतर विजय मिळवणे अशक्य होते. पण रियान आणि राहुल यांनी हीच अशक्य गोष्ट करून दाखवली. या दोघांनी नाबाद ८५ धावांची भागिदारी केली. रियानने २६ चेंडूत नाबाद ४२ (२ चौकार, दोन षटकार) तर राहुले २८ चेंडूत नाबाद ४५ (४ चौकार,२ षटकार ) धावा केल्या.

वाचा-

राजस्थान विजयाच्या जवळ पोहोचल्यानंतर मैदानात एक राडा देखील पाहायला मिळाला. अखेरच्या षटकात राजस्थानला विजयासाठी ६ चेंडूत ८ धावांची गरज होती. हैदराबादकडून गोलंदाजी करत होता. पहिल्या चार चेंडूत राहुल आणि रियानने ६ धावा केल्या. विजयासाठी २ चेंडूत २ धावांची गरज असताना राहुल तेवतिया आणि गोलंदाज खलील अहमद यांच्यात वाद झाला. खलीलने राहुलला धक्का देखील दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-

खलीलच्या चौथ्या चेंडूवर राहुलने एक धाव घेतली. तेव्हाच या दोघांमध्ये वाद झाला. पण ही गोष्टी फार कोणाच्या लक्षात आली नाही. पाचव्या चेंडूवर रियानने षटकार मारून विजय मिळून दिला. आणि विजयानंतर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर राहुलच्या जवळ आला आणि दोघात वाद सुरू झाला. त्यानंतर खलील जेव्हा हात मिळवण्यासाठी आला तेव्हा राहुल आणखी भडकला. तो बोट दाखवून काही तरी बोलत होता. पण खलीलने त्याला समजावले आणि वाद मिटला.

वाचा-

हैदराबादने मनीष पांडेच्या ५६ आणि डेव्हिड वॉर्नरच्या ४८ धावांच्या जोरावर १५८ धावा केल्या होत्या. गोलंदाजी देखील हैदराबादने पूर्ण वचर्स्व मिळवले होते. राहुल आणि रियान यांनी सहाव्या विकेटसाठी ७.५ षटकात ८५ धावांची भागिदारी करत धमाकेदार विजय मिळवून दिला.

राजस्थानसाठी हा विजय महत्त्वाचा होता. कारण त्यांनी याआधी ४ सामन्यात पराभव स्विकारला होता. या विजयामुळे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या त्याच्या आशा कायम आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here