शारजा: आयपीएल () च्या १३व्या हंगामात आज (सोमवार) शारजाच्या मैदानावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची लढत दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सशी ( vs ) होणार आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत आणि प्रत्येकी ४ विजय मिळवले आहेत. गुणतक्त्यात यांचे गुण जरी सारखे असेल तरी नेट रनरेटअधिक असल्यामळे कोलकाता तिसऱ्या तर बेंगळुरू चौथ्या स्थानावर आहे.

वाचा-

या आधीच्या सामन्यात विराटच्या बेंगळुरूने धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता. तर कोलकाताने किंग्ज इलेव्हन पंजाबवर निसटचा विजय मिळवला होता. स्पर्धेच्या सुरुवातीला बेंगळुरूची कामगिरी चांगली झाली नव्हती. पण हळूहळू संघ लय पकडत आहे. कोहलीने गेल्या तीन सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. त्याने चेन्नईविरुद्ध नाबाद ९० धावा करत विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

वाचा-

बेंगळुरूकडे शिवाय सलामीला देवदत्त पडिक्कल आहे. जो सध्या चांगली फलंदाजी करत आहे. एरोन फिंच सारखा एक चांगला फलंदाज आहे. त्याच बरोबर एबी डिव्हिलियर्स सारखा स्टार फलंदाज आहे. खालच्या क्रमांकावर शिवम दुबे मोठे शॉट खेळू शकतो. गेल्या सामन्यात ख्रिस मॉरिसला संधी दिली होती. तो देखील चेंडू सीमा रेषेच्या बाहेर घालवू शकतो.

वाचा-

गोलंदाजीची चिंता नाही
बेंगळुरूसाठी गोलंदाजी देखील काळजीचा विषय नाही. इसुरू उदाना, नवदीप सैनी यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. तर ख्रिस मॉरिसने चार षटकात फक्त १९ धावा दिल्या होत्या. फिरकीपटू युजवेंद्र चहल कोहलीसाठी हुकमी एक्का आहे. चेन्नईविरुद्ध दोन महत्त्वाच्या विकेट घेऊन त्याने सामना फिरला होता. पण शारजाचे मैदान छोटे आहे आणि फिरकीपटूला येथे साध मिळत नाही. या सामन्यात विराट एक अतिरिक्त गोलंदाजाला संघात घेऊ शकतो.

वाचा-

कोलकाताकडे सुनील नरेन आणि वरुन चक्रवर्ती या फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केली आहे. सुनिलने गेल्या सामन्यात दोन चांगली षटक टाकली होती. अर्थात नरेनच्या गोलंदाजीच्या अॅक्शनवरून सध्या तक्रार करण्यात आली आहे. आज कोलकाताच्या गोलंदाजांचा मुकाबला सर्वोत्तम फलंदाजांविरुद्ध होत आहे. कोलकाताकडे शिवम मावी आणि प्रसिद्ध कृष्णा सारखे जलद गोलंदाज आहेत ज्यांनी आतापर्यंत चागंली गोलंदाजी केली आहे. त्याच्या जोडीला पॅट कमिन्स आणि कमलेश नागरकोटी हे असतीलच.

गेल्या सामन्यात कर्णधार दिनेश कार्तिकने धमाकेदार फलंदाजी केली होती. त्यामुळे कोलकाताची फलंदाजीची धार आणखी वाढली आहे. त्यांची सलामीची जोडी राहुल त्रिपाठी आणि शुभमन गिल देखील फॉर्ममध्ये आहेत. फलंदाजीत काळजी करायची झाली तर ती आंद्र रसेलच्या बाबत. त्याला आतापर्यंत प्रभाव टाकता आला नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here