टी-२० क्रिकेटमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत झिम्बाब्वेच्या १९ वर्षाखालील संघाचा ( Vs )विकेटकीपरने धोनीच्या स्टाईलने फलंदाजाला बाद केले. झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड यांच्या १० वर्षाखालील सामन्यात डेन शेनडेनडॉर्फ याने फलंदाजाला बाद केलेला व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे.
वाचा-
न्यूझीलंडचा फलंदाज बॅकहम व्हीलर फिरकीपटू टाडीवनाशे न्यानगानीच्या चेंडूवर शॉट मारण्यासाठी पुढे आला. पण बॉल आणि बॅटचा संपर्कच झाला नाही आणि चेंडू शेनडेनडॉर्फकडे गेला.
वाचा-
चेंडू विकेटपासून थोडा दूर जात होता. तेव्हा शेनडेनडॉर्फने पाळत जात चेंडू एका हाताने विकेटच्या दिशेने फेकला. चेंडू थेट विकेटला लागला आणि तेव्हा व्हीलर विकेटपासून फार लांब होता. शेनडेनडॉर्फच्या या विकेटकिपिंगचे सर्वजण कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर नेटीझन्स शेनडेनडॉर्फचा हा व्हिडिओ शेअर करत आहेत.
काही युझर्सनी धोनीची आठवण आल्याचे म्हटले आहे तर काहीनी संगकारारासारखी किपिंग केल्याचे म्हटले आहे.
Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News