नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटपटू आणि जगभरातील अन्य खेळाडू आयपीएलचा () आनंद घेत आहे. या वर्षी भारतीय खेळाडू आयपीएल गाजवत आहे. तर काही परदेशी खेळाडू देखील चांगली कामगिरी करत आहेत. अशा खेळाडूंमध्ये आघाडीचे नाव म्हणजे अफगाणिस्तानचा फिरकीपटू होय. या खेळाडूचे नाव आता एका विचित्र कारणामुळे चर्चेत आले आहे.

वाचा-

भारताचा कर्णधार आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे नेतृत्व करणारा विराट कोहली सध्या धमाकेदार फलंदाजी करत आहे. त्याचा सपोर्ट करण्यासाठी पत्नी देखील युएईमध्ये आहे. अनुष्का सध्या गर्भवती आहे. येत्या जानेवारी महिन्यात कोहली कुटुंबात नवा पाहून येणार आहे. पण सध्या अनुष्का एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली असून तिच्या सोबत राशिद खान समावेश आहे.

वाचा-

अनुष्का आणि राशिद खानचा काय संबंध असा प्रश्न कोणालाही पडेल. पण सध्या गुगलवर अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानची पत्नी (Rashid Khan’s wife) असा सर्च केल्यानंतर नाव येते ते अनुष्का शर्माचे. होय वाचताना आणि ऐकदाना देखील धक्का वाटणारी ही गोष्टी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. असे गुगल सर्च केल्यावर अनुष्काचे नाव येत असल्याचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत.

वाचा-

गुगल सर्च झाले तरी काय?
अनुष्का ही विराट कोहलीची पत्नी आहे हे सर्वांना माहित आहे. मग गुगलकडून अशी चूक का व्हावी असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याचा शोध घेतल्यानंतर असे समोर आले की, २०१८ साली राशीद खानने एका मुलाखतीत बॉलिवूडमधील सर्वात आवडती अभिनेत्री म्हणून अनुष्का शर्मा आणि प्रिती झिंटा यांचे नाव घेतले होते. तेव्हा राशिद चर्चेत आला होता. त्या एका मुलाखतीनंतर राशिद खानची पत्नी म्हणून गुगल सर्चवर अनुष्काचे नाव येऊ लागले.

वाचा –

राशिद खानने जुलै २०२० मध्ये एका मुलाखतीत अद्याप विवाह झाला नसल्याचे सांगितले होते. अनुष्का आणि विराट कोहली यांनी ११ डिसेंबर २०१७ रोजी विवाह केला होता. काही दिवसांपूर्वी या दोघांनी सोशल मीडियावर गोड बातमी सर्वांना दिली होती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here