झहीर आणि सागरिका यांचे हे पहिले बाळ आहे. या दोघांनी २०१७ साली लग्न केले होते. सध्या हे दोघेही युएईमध्ये आहेत. झहीर सध्या मुंबई इंडियन्स संघाचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स म्हणून काम करतोय. गुड न्यूजबद्दल अद्याप झहीर किंवा सागरिका यांनी काही सांगितेल नाही. पण मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, झहीर खान आणि सागरिका यांच्या मित्रांनी या गुड न्यूजला दुजोरा दिला आहे.
वाचा-
काही दिवसांपूर्वी झहीर खानने युएईमध्ये त्याचा वाढदिवस साजरा केला होता. तेव्हा सागरिका देखील त्याच्या सोबत होती. मुंबई इंडियन्स संघाने वाढदिवस साजरा करत असलेला व्हिडिओ शेअर केला होता.
भारतीय क्रिकेटपटूमध्ये या वर्षी अनेक खेळाडूंनी गुड न्यूज दिल्या आहे. यामध्ये सुरेश रैना, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल आणि विजय शंकर यांचा समावेश होता. आता विराटने देखील अशीच गुड न्यूज दिली.
वाचा-
या वर्षी सुरेश रैनाला दुसरे बाळ झाले. रैनाला मार्च महिन्यात मुलगा झाला होता. त्याला २०१६ मध्ये पहिली मुलगी झाली होती. त्यानंतर हार्दिक पांड्याने विवाह आणि गुड न्यूज एकत्र दिली. काही दिवसांपूर्वी त्याला मुलगा झाला. तर चहल आणि विजय शंकर यांनी आयपीएलला रवाना होण्याआधी साखरपुडा उरकला.
वाचा-
वर्षाच्या सुरुवातीला हार्दिक पांड्याने फिल्मी स्टाइलने गर्लफ्रेंड नताशा स्टानकोविचसह समुद्रात साखरपुडा केला होता. त्यानंतर लॉकडाउनमध्ये हार्दिक आणि नताशा एकत्र होते. त्यांनी विवाह आणि गुड न्यूज एकाच वेळी सर्वांना सांगितल. या दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही बातमी दिली होती. त्यानंतर हार्दिक आणि नताशा बेबी बंपचे फोटो शेअर करत होते. या दोघांना काही दिवसांपूर्वी मुलगा झाला. त्यानंतर चहलने धनश्री वर्मा आणि विजय शंकरने वैशाली विश्वेश्वरन सोबत आयपीएलला रवाना होण्याआधी साखरपुडा केला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times