दुबई: युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा ( ) संघ चांगली कामगिरी करत आहे. या संघाने आतापर्यंत झालेल्या ७ पैकी ५ सामन्यात विजय मिळून प्ले ऑफमध्ये स्थान जवळ जवळ पक्क केले आहे. काल मुंबई विरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्लीचा पराभव झाला असला तरी दिल्लीची आतापर्यंतची कामगिरी चांगली झाली आहे.

वाचा-

गुणतक्त्यात दिल्लीचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. पण आता त्यांना एक मोठा झटका बसला आहे. मुंबई विरुद्धच्या सामन्यात () खेळू शकला नाही. त्याची कमी दिल्लीला जाणवली. आता पंत पुढील काही सामने खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. पंतला हॅमस्ट्रिंग इंजरी असून तो पुढील एक आठवडा संघातून बाहेर असेल. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने ही माहिती दिली.

वाचा-

वाचा-

दिल्ली कॅपिटल्सचा सातव्या सामन्यात मुंबई विरुद्ध ५ विकेटनी पराभव स्विकारावा लागला. या सामन्यात ऋषभ पंतची कमतरता संघाला जाणवली. कारण अखेरच्या काही षटकात दिल्लीला वेगाने धावा करता आल्या नाहीत. पंतच्या जागी मुंबई विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर एलेक्स कॅरीला संधी दिली होती. पण त्याला फार प्रभाव टाकता आला नाही. अजिंक्य रहाणेला देखील पहिल्या सामन्यात यश आले नाही.

वाचा-

शुक्रवारी दिल्लीचा सामना राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झाला होता. त्या सामन्यात पंतला दुखापत झाली होती. दिल्लीचा पुढील सामना १४ ऑक्टोबर रोजी राजस्थानविरुद्ध होणार आहे. त्यानंतर १७ तारखेला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध तर २० तारखेला किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध होणार आहे. या तिन्ही सामन्यात पंतला खेळता येणार नाही.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here