वाचा-
हैदराबादने दिलेल्याय १५९ धावांचा पाठलाग करताना राजस्थानची अवस्था ५ बाद ७८ अशी झाली होती. पण त्यानंतर राहुल तेवतिया आणि रियान पराग यांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद ८५ धावांची भागिदारी केली. अखेरच्या षटकात विजयासाठी २ चेंडूत २ धावांची गरज असताना रियान परागने षटकार मारत विजय मिळून दिला.
वाचा-
या विजयानंतर रियानने मैदानावर डान्स केला. त्याने () केला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक जण रियानचे कौतुक करत आहेत. १८ वर्षी रियान आसाम राज्यातून येतो. त्याने मैदानावर जो डान्स केला तो राज्यातील पारंपारिक नृत्य प्रकार होता. रियानला गेल्या वर्षी राजस्थानने २० लाख रुपयांना विकत घेतले होते.. याआधी तो आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खेळला आहे.
वाचा-
रियान २०१८ साली राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला होता. तेव्हा तो १६ वर्षाचा होता. वर्ल्ड कपच्या आधी भारतीय ज्युनियर संघाकडून खेळताना इंग्लंडमध्ये दोन कसोटीत तीन अर्धशतकी खेळी त्याने केली.
वाचा-
रियानच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावण्याचा विक्रम आहे. त्याने १७ वर्ष १७५ दिवशी अर्धशतक केले. तो लेगब्रेक गोलंदाजी करतो आणि आतापर्यंत दोन विकेट घेतल्या आहेत.
वाचा-
धोनी कनेक्शन
रियानचे वडील (पराग दास) क्रिकेटपटू होते आणि ते आसामकडून खेळत होते. तर त्याची आई मिठू बरुआ जलतरणपटू होती आणि राष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळवले होते. रियानचे वडील आणि धोनीचे एक खास कनेक्शन आहे. पराग दास रेल्वेकडून क्रिकेट खेळत. त्यांच्या संघात धोनी देखील होता. वडील धोनी सोबत तर पुत्र धोनी विरुद्ध खेळत आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times