नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामात () आणि चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी अतिशय खराब झाली आहे. या संघाला ७ पैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवता आला आहे. संघाचा कर्णधार धोनीची फलंदाजी देखील फॉर्ममध्ये दिसली नाही. गेल्या काही दिवसात सर्व जण आणि धोनीवर टीका करत असताना भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने मात्र वेगळी प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा-

भारताचे माजी विकेटकीपर (Syed Kirmani) यांनी या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही. तसेच जे लोक धोनीवर टीका करत आहेत त्यांच्या बुद्धीवर दया येते. प्रत्येक खेळाडूच्या करिअरमध्ये अशा प्रकारची अवस्था येणे गरजेचे आहे. उंचीवर पोहोचण्याची एक वेळ असते. तशीच खाली येण्याची देखील एक वेळ असते. वेळेनुसार प्रत्येक गोष्ट बदलते. जे लोक आज धोनीवर टीका करत आहेत त्यांच्या विचारांवर मला दया येते, असे किरमानी म्हणाले.

वाचा-

वाचा-

धोनी आता मॅच विनर आणि फिनिशर राहिला नाही का या प्रश्नावर किरमानी म्हणाले, आता धोनीकडून तुम्ही त्या प्रकारच्या क्रिकेटची अपेक्षा करू शकत नाही जसा तो १०-१५ वर्षापूर्वी करत होता. आपल्याला निसर्ग नियमाचा स्विकार करावा लागले. तो सर्वोत्तम फिनिशर होता. पण आता मोठ्या कालावधीनंतर मैदानावर उतरला आहे त्यामुळे त्याची कामगिरी खराब होत आहे.

वाचा-

आयपीएलचे ३ वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या धोनीच्या खराब कामगिरीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. सोशल मीडियावर देखील त्याच्यावर टीका होत आहे. आतापर्यंत झालेल्या ७ सामन्यातील ६ डावात त्याला फक्त ११२ धावा करता आल्या. यात एकाही अर्धशतकाचा समावेश नाही.

वाचा-

धोनी मोठ्या कालावधीनंतर क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर देखील परिणाम होत असल्याचे किरमानी म्हणाले. धोनी फक्त क्रिकेटपटू नाही तर त्याच्यावर इतरपण जबाबदाऱ्या आहेत. अशा वेळी खेळाडूच्या कामगिरीवर परिणाम होतो. त्यात युएईच्या उष्ण वातावरणात होत आहे. तर खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here