दुबई: मुंबई इंडियन्सकडून रविवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल स्थानही दिल्लीला गमवावे लागले होते. पण त्यानंतर आज दिल्लीच्या संघाला अजून एक धक्का बसला आहे. दिल्लीचा अनुभवी वेगवान गोलंदाज आता आयपीएलला मुकणार असल्याचे समोर आले आहे.

हा हंगाम सुरु होण्यापूर्वीच इशांतला दुखापत झाली होती. पण या दुखापतीमधून तो सावरलेला होता. पण काही दिवसांपासून तो संघात दिसत नव्हता. त्याच्यावर काही वैद्यकीय उपचार सुरु होते. पण आता इशांतची दुखापत ही गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला आता यावर्षीच्या आयपीएलला मुकावे लागणार आहे, असे स्पष्टपणे दिसत आहे.

दिल्लीसाठी हा दुसरा धक्का असेल. कारण यापूर्वी दिल्लीचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रालाही दुखापत झाली होती. त्यामुळे तोदेखील आयपीएलमधून खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. आता इशांतही दुखापतीमुळे या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. दुखापीतीमुळे त्याने आयपीएलमधून माघार घेतलेली आहे. दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडणारा इशांत शर्मा हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. अमित मिश्राबरोबर सनरायझर्स हैदराबाद संघाचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे आयपीएलमधून खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनीच कमाल केल्याचे पाहायला मिळाले. भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने दिल्लीला १६२ धावांवर रोखले होते. दिल्लीच्या १६३ धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या क्विंटन डीकॉक आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी अर्धशतके झळकावत संघाला सहज विजय मिळवून दिला.

दिल्लीच्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. कारण त्यांनी कर्णधार रोहित शर्माला लवकर गमावले. रोहितला यावेळी पाच धावाच करता आल्या. रोहित बाद झाल्यावर सलामीवीर क्विंटन डीकॉक आणि सूर्यकुमार यादव यांची चांगलीच जोडी जमली. डीकॉक यावेळी धडाकेबाज फलंदाजी करत होता आणि दमदार फटकेबाजीच्या जोरावर डीकॉकने आपले अर्धशतकही साजरे केले. ही जोडी आता मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असतानाच दिल्लीच्या आर. अश्विनने डीकॉकला बाद केले, त्याला ३६ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५३ धावा करता आल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here