या सामन्याच्या सहाव्या षटकात पहिली गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. हे षटक केकेआरचा आंद्रे रसेल टाकत होता. या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर आरसीबीच्या आरोन फिंचने लेग साईडला मोठा फटका लगावला. पण केकेआकच्या कमलेश नागरकोटीचे चेंडूवर लक्ष नव्हते. त्यामुळे फिंचला यावेळी चौकार आंदण मिळाला. त्यानंतरच्या सातव्या षटकात पुन्हा एकदा केकेआरचे गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. हे षटक केकेआरचा युवा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती टाकत होता. यावेळी फिंचने मिड विकेटला एक फटका लगावला. त्यावेळी चेंडू केकेआरच्या शुभमन गिलच्या हातात सहजपणे जात असल्याचे पाहायला मिळाले. पण त्याचवेळी गिलने चेंडूवर नजर कायम ठेवली नाही. त्यामुळे गिलच्या हातामधून चेंडू निसटला. चेंडू निसटल्याचे गिलले समजले आणि त्याने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत चेंडू सीमारेषेला लागलेला होता आणि फिंचला पुन्हा एकदा चार धावा मिळाल्या होत्या.
आठव्या षटकातही यावेळी केकेआरचे गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. आठवे षटक आंद्रे रसेल टाकत होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडीक्कलने लाँग ऑफच्या दिशेने मोठा फटका लगावला. त्यावेळी केकेआरचा प्रसिध कृष्णा हा क्षेत्ररक्षण करत होता. प्रसिध यावेळी हा झेल पकडेल असे वाटत होते. प्रसिध चेंडूच्या दिशेने गेला खरा, पण चेंडू जसा जवळ आला तसे त्याचे चेंजूवर लक्ष कायम राहिले नाही. त्यामुळे देवदत्तला यावेळी षटकार मिळाला. पण प्रसिधने जर चेंडूवर लक्ष दिले असते तर नक्कीच देवदत्त आऊट झाला असता.
केकेआरच्या खेळाडूंनी सहाव्या, सातव्या आणि आठव्या षटकात मोठ्या चुका केल्या. या चुका झाल्या नसत्या तर आरसीबीला फक्त दोन धावा मिळाल्या असत्या आणि त्यांना सलामीवीर देवदत्त पडीक्कलला गमवावे लागले असते. पण यावेळी केकेआरच्या क्षेत्ररक्षकांनी वाईट कामगिरी केल्यामुळे आरसीबीला २ ऐवजी १४ धावांचा बोनस मिळाला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times