वाचा-
आयपीएलच्या इतिहासात असे कधीच घडले नाही की चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली CSK नेहमीच पहिल्या चारमध्ये असतो. पण यावेळी ही गोष्टी अवघड दिसत आहे. अंतिम चारमध्ये जागा मिळवण्यासाठी त्यांना किमान पाच मध्ये विजय मिळवणे गरजेचे असेल. याआधी झालेल्या साखळी सामन्यात हैदराबादने चैन्नईचा पराभव केला होता.
वाचा-
धोनीने गेल्या सामन्यात बेंगळुरूविरुद्ध पराभव झाल्यानंतर मान्य केले होते की, फलंदाजी योग्य प्रकारे होत नाही. त्याच तातडीने बदल करण्याची गरज आहे. आज होणाऱ्या सामन्यात काही बदल होतो का हे पाहणे गरजेचे आहे. शेन वॉट्सन आणि फाफ डुप्लेसिस वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला धावसंख्या करता आलेल्या नाहीत.
वाचा-
आघाडीच्या फलंदाजांमध्ये अंबाती रायडू पहिल्या सामन्यात खेळला. त्यानंतर तो ही धावा करू शकला नाही. केदार जाधव अपयशी ठरला म्हणून एन जगदीशनला संधी दिली पण तोही वेगाने खेळू शकला नाही. , रविंद्र जडेजा आणि ब्राव्हो यांना देखील अपेक्षे प्रमाणे खेळता आले नाही. या सर्व अडचणीतून चेन्नईला मार्ग काढावा लागणार आहे.
गोलंदाजांची कामगिरी चांगली
चेन्नईच्या गोलंदाजांनी फलंदाजांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. प्रतिस्पर्धी संघांना त्यांनी मोठी धावसंख्या करू दिली नाही. शार्दुल ठाकरू, दीपक चाहर, सॅम करन, फिरकीपटू रविंद्र जडेजा, कर्ण शर्मा यांच्या कामगिरीवर धोनी समाधानी आहे.
वाचा-
हैदराबादविरुद्ध होणाऱ्या आजच्या सामन्यात चेन्नईला फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. टी.नटराजन, खलील अहमद आणि राशिद खान सारख्या गोलंदाजांना चेन्नईला सामोरे जावे लागणार आहे. SRHची सलामीची जोडी जॉनी बेयरस्टो, डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. केन विलियमसन सारखा फलंदाज मधळ्याफळीत आहे. त्यामुळे चांगल्या धावसंख्येचा पाठलाग ते करू शकतात. प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा देखील अखेरच्या षटकात फटकेबाजी करू शकतील.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times