स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या कामगिरीचा आढावा घेतल्यास गतविजेते मुंबई इंडियन्स गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहेत. तर अखेरच्या स्थानावर आहे. वैयक्तीक खेळाडूंची कामगिरी पाहिल्याच जो संघ अखेरच्या स्थानावर आहे त्याचा कर्णधार आघाडीवर दिसतोय.
वाचा-
या वर्षी स्पर्धा सुरू होताना दोन संघांकडून खुप अपेक्षा होत्या. त्यातील पहिला संघ म्हणजे दिल्ली कॅपिटल्स होय तर दुसरा संघ किंग्ज इलेव्हन पंजाब () होय. यातील दिल्लीने चांगली कामगिरी केली आणि ते गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर आहेत. तर पंजाब मात्र अखेरच्या स्थानावर. पण पंजाबचा कर्णधार केएल राहुल () वैयक्तीत कामगिरीत आघाडीवर आहे. आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे.
वाचा-
केएल राहुलने ७ सामन्यात ३८७ धावा केल्या आहेत. या वर्षी पहिले शतक त्यानेच झळकावले आहे. नाबाद १३२ ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. ६४.५० ची सरासरी आणि १३४.८४च्या स्टाईकरेटने त्याने धावा केल्या आहेत. राहुलच्या नावावर ३ अर्धशतके आहेत. त्याने १० षटकार आणि ३७ चौकार मारले आहेत. वैयक्तीक कामगिरी राहुल आघाडीवर असला तरी तो नेतृत्व करत असलेला संघ मात्र ७ पैकी एका विजयासह अखेरच्या स्थानावर आहे.
वाचा-
सर्वाधिक धावांच्या बाबत दुसऱ्या स्थानावर पंजाबचा मयांक अग्रवाल आहे. त्याने ७ सामन्यात ३३७ धावा केल्या आहेत. आयपीएलमधील दुसरे शतक त्याच्या नाववर आहे. यावर्षी आतापर्यंत दोघांनीच शतक केली आहेत. ही दोन्ही शतक पंजाबच्या खेळाडूंच्या नावावर आहेत.
गोलंदाजांचा विचार केल्यास दिल्ली कॅपिटल्सचा कसिगो रबाडाने ७ सामन्यात १७ विकेट घेतल्या आहेत. त्याची सरासरी ७.६९ इतकी आहे. ४ वर २४ ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. दुसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह आहे. त्याने ११ विकेट घेतल्या असून २ वर २० ही सर्वोत्तम कामगिरी आहे. तर तिसऱ्या स्थानावर मुंबईचाच ट्रेंट बोल्ट असून त्याने देखील ११ विकेट घेतल्या आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times