दुबई: किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी ()आयपीएल २०२० काही चांगले ठरले नाही. आतापर्यंत झालेल्या सात सामन्यात त्यांना फक्त एकच विजय मिळवता आला. कर्णधार केएल राहुल आणि मयांक अग्रवाल वगळता अन्य फलंदाज प्रभाव टाकू शकले नाहीत. पण आता त्यांच्यासाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे.

वाचा-

गेल्या काही दिवसांपासून पंजाब षटकारांचा किंग () ला संधी का देत नव्हता असा प्रश्न सर्वांना पडला होता. फुड पॉयझनिंगमुळे गेल खेळू शकला नाही असे समोर आले होते. आता मात्र तो फिट झाला असून पंजाब आणि बेंगळूरू यांच्यात होणाऱ्या सामन्यात गेल खेळू शकतो.

वाचा-

फुड पॉयझनिंगमुळे गेल शनिवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध खेळू शकला नव्हता. त्यानंतर गेलने रुग्णालयातील एक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला होता. आता सोमवारी पंजाब संघाने गेल नेटस् मध्ये सराव करत असल्याचा फोटो शेअर केला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार गेल गुरुवारी होणाऱ्या सामन्यात खेळणार आहे. हा सामना शारजा मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध होणार आहे.

वाचा-

गेलने आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारले आहेत आणि शारजा मैदान षटकारासाठी आदर्श मानले जाते. पंजाबकडून मयांक अग्रवाल आणि केएल राहुल यांनी सलामीला चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे गेलला अंतिम ११ मधून बाहेर बसवण्यात आले होते. जेव्हा त्याला संधी देण्याचा विचार केला तेव्हा तो आजारी पडला.

वाचा-

पंजाब संघाच्या प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्याची शक्यता अतिशय कमी झाली आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी पंजाबला चमत्कारीक कामगिरी करावी लागले. यासाठी गेलची मदत होऊ शकते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here