वाचा-
गुणतक्त्यात किंग्ज इलेव्हन पंजाब अखेरच्या तर सातव्या स्थानावर आहे. काल बेंगळुरू आणि कोलकाता यांचा सामना झाल्यानंतर प्लेऑफमध्ये कोण जाणार याची चर्चा सुरू झाली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू () ने प्लेऑफसाठीचे चार संघ निवडले आहेत. विशेष म्हणजे सध्या तिसऱ्या स्थानावर असेल्लया बेंगळुरू संघाला अंतिम चार मध्ये घेतले नाही.
वाचा-
आगरकरच्या मते दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे आतापर्यंतचे सर्वोत्तम संघ ठरले आहेत. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता हे तीन संघ निश्चितपणे प्लेऑफमध्ये जातील. प्लेऑफमधील चौथ्या स्थानासाठी राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत असेल.
वाचा-
वाचा-
क्रिकेट कनेक्टेड या कार्यक्रमात बोलताना तो म्हणाला, आयपीएममध्ये बरेच चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. पण फॉर्म आणि खेळाडूंचा विचार करता मुंबई आणि दिल्ली सर्वोत्तम संघ दिसत आहेत. चेन्नई विरुद्ध मिळवलेल्या विजयाचा कोलकाता संघाला फायदा होईल. ते प्लेऑफमध्ये तिसऱ्या स्थानावर असतील. तर चौथा संघ राजस्थान किंवा हैदराबाद यांच्यापैकी एक असेल.
वाचा-
या खेळाडूने देखील दिला हैदराबादला पाठिंबा
फक्त आगरकरच नाही तर इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रीम स्वान याने देखील सनरायजर्स हैदराबाद प्लेऑफमध्ये पोहोचेल असे म्हटले आहे. चौथ्या स्थानासाठी हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात खरी लढत असेल. राजस्थानकडे राहुल तेवतिया आणि बेन स्टोक्स सारखे खेळाडू आहेत, असे स्वान म्हणाला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times