मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्ध () झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा लाजीरवाणा पराभव झाला. प्रथम फलंदाजीकरत भारतीय संघाने २५५ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने विजयाचे लक्ष्य एकही विकेट न गमवता पार केले. डेव्हिड वॉर्नरने ११२ चेंडूत १७ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद १२८ धावा केल्या. तर कर्णधार अॅरॉन फिंचने ११४ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ११० धावा केल्या. दोन्ही सलामीवीरांनी २५६ धावांचे लक्ष्य पार केले. एकतर्फी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७४ चेंडूत आणि १० विकेट राखून विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेतील भारतीय संघाच्या कामगिरीमुळे अनेकांना धक्का बसला होता. या सामन्यात विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. तसेच भारतीय गोलंदाजांना देखील फार प्रभावी कामगिरी करत आली नव्हती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवण्यासाठी भारताला दुसरा सामना कोणत्याही परिस्थिती जिंकणे गरजेचे आहे.

वाचा-

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा () अध्यक्ष सौरव गांगुलीने () भारतीय संघाचे मनोबल वाढवले आणि शुभेच्छा दिल्या आहेत. मैदानातील एक दिवस खराब होता त्यामुळे भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध १० विकटनी पराभव झाला. विराट कोहली आणि संघामध्ये दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक करण्याची क्षमता असल्याचे गांगुलीने म्हटले आहे.

वाचा- ही

ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पुढील दोन्ही सामने शानदार होणार आहेत. भारतीय संघ मजबूत आहे. मैदानातील एक दिवस खराब झाल्यामुळे पहिला सामना गमवावा लागला. याआधी देखील भारतीय संघ अशा परिस्थीतीतून गेला आहे. दोन वर्षापूर्वी मालिकेत ०-२ने पिछाडीवर असताना टीम इंडियाने कमबॅक केले होते. भारतीय संघाला पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा, असे गांगुलीने ट्विटवरील पोस्टमध्ये म्हटले.

भारताची ऑस्ट्रेलियविरुद्धची दुसरी लढत १७ जानेवारी रोजी राजकोट येथे तर तिसरी आणि अंतिम लढत रविवारी १९ जानेवारी रोजी होणार आहे.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here