शारजा, : : आरसीबीने सोमवारी केकेआरवर मोठआ विजय मिळवला. त्यानंतर आरसीबीचा यशस्वी फिरकीपटू युजवेंद्र चहलने एक कमेंट केली होती. चहलच्या या कमेंटवर भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगने पलटवार केल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आता मला मैदानात उतरावे लागेल, असेही युवराजने चहलला सांगितले आहे.

या आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांत चहलने सात सामन्यांमध्ये १० विकेट्स मिळवल्या आहेत. त्याचबरोबर केकेआरविरुद्धच्या सामन्यात चहलने चार षटकांमध्ये फक्त १२ धावा देत एक विकेट मिळवली होती. या सामन्यात आरसीबीने केकेआरवर ८२ धावांनी विजय मिळवला होता. या विजयानंतर चहलने एक ट्विट केल्याचे पाहायला मिळाले.

चहलने सामना जिंकल्यावर एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्याने आपल्या आरसीबी संघाचा एक फोटो वापरला आहे. त्याचबरोबर या फोटोखाली चहलने कमेंटही केली आहे. या फोटोच्या खाली चहलने लिहिले आहे की, ” संगीतामध्ये सिंफनी नावाच एक प्रकार असतो. हा प्रकार कोणताही एक व्यक्ती सूरबद्ध करू शकत नाही किंवा एका वाद्याने ती बनतही नाही. त्यासाठी पूर्ण ऑर्केस्ट्रा लागतो. तसेच आमच्या आरसीबी संघाचे आहे. आमच्या सांघिक कामगिरीचा हा विजय आहे.”

चहलच्या या ट्विटवर युवराज सिंगने पलटवार केल्याचे पाहायला मिळत आहे. युवराजने यावेळी चहलवर पलटवार करताना म्हटले आहे की, ”
“चहल, तु प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाला मोठे फटके मारायलाच देत नाहीस. त्यामुळे मला असं वाटतं आहे की, आता मलाच मैदानात पुन्हा उतरावे लागेल. पण चहल, तुझी गोलंदाजी नक्कीच चांगली होत आहे.”

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाने आजच्या सामन्यात केकेआरला मोठा धक्का दिला. एबी डिव्हिलियर्सचे झंझावाती अर्धशतक आणि गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीने केकेआरवर विजय मिळवला. आरसीबीने यावेळी केकेआरवर ८२ धावांनी सर्वात मोठा विजय साकारला. एबी डिव्हिलियर्सच्या फलंदाजीचे वादळ आज पुन्हा एकदा अनुभवता आले. एबीने फक्त २३ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण करत केकेआरच्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले. एबीने यावेळी फक्त ३३ चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ७३ धावांची वादळी खेळी साकारली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाने यावेळी केकेआरच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आरसीबीच्या संघाला यावेळी केकेआरपुढे १९५ धावांचे आव्हान ठेवता आले. कोहलीने यावेळी २८ चेंडूंत नाबाद ३३ धावा केल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here