रोनाल्डो हा एक फुटबॉल विश्वातील स्टार खेळाडू आहे. त्याचबरोबर त्याचे करोडो चाहतेही आहेत. त्यामुळे रोनाल्डोला करोना झाल्याची बातमी जेव्हा आली तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता रोनाल्डो पुन्हा मैदानात कधी दिसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
पोर्तुगालची नॅशनल फुटबाल लीग सुरु आहे. बुधवारी स्वीडनबरोबर त्यांचा सामना होणार होता. पण आता रोनाल्डोला हा सामना खेळता येणार नाही. सध्याच्या घडीला रोनाल्डोला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे आणि त्याच्यावर सध्याच्या घडीला उपचार सुरु आहेत.
पोर्तुगालच्या सर्व खेळाडूंची मंगळवारी चाचणी करण्यात आली आणि संघातील खेळाडू हे करोना निगेटीव्ह सापडले आहेत. त्यामुळे बुधवारी लिस्बन येथे होणारा सामना त्यांना खेळता येणार आहे. पण या सामन्यात पोर्तुगालच्या संघाला रोनाल्डोची उणीव नक्कीच भासेल, असे म्हटले जात आहे. पण रोनाल्डो मैदानात नेमका कधी परतणार, याकडे सर्व फुटबॉल विश्वाचे नक्कीच लक्ष असेल. त्यामुळे आता रोनाल्डोवर कसे उपचार होतात आणि तो कधी फिट होतो, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना नक्कीच असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times