क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱ्या मानधनाचे ग्रेड ‘ए प्लस’, ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ असे चार प्रकार करण्यात आले आहेत. ‘ए प्लस’मध्ये असलेल्या क्रिकेटपटूंना ७ कोटी, ‘ए’ ग्रेडमधील खेळाडूंना ५ कोटी, ‘बी’ ग्रेडमधील खेळाडूंना ३ कोटी तर अखेरच्या ‘ग्रेड सी’मधील खेळाडूंना १ कोटी मानधन दिले जाईल.
वाचा-
यावेळी ‘ग्रेड ए प्लस’मध्ये भारतीय संघाचा कर्णधार , हिटमॅन आणि वेगवान गोलंदाज या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. ‘ए ग्रेड’मध्ये आर.अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत यांचा समावेश करण्यात आला आहे.
वाचा-
‘ग्रेड बी’ मध्ये वृद्धीमान सहा, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या, मयांक अग्रवाल हे खेळाडू आहेत. तिसऱ्या म्हणजेच ‘ग्रेड सी’मध्ये केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पंड्या, हनुमान विहारी, शादुर ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे.
धोनीला डच्चू
गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असलेल्या महेंद्रसिंह धोनीला बीसीसीआयने करारातून वगळले आहे. धोनीने गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून अखेरचा सामना खेळला होता.
वाचा-
Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News