वाचा-
चेन्नईने हैदराबादवर मिळवलेला हा १०वा विजय ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासात असा पहिला संघ आहे ज्याने सर्व संघाविरुद्ध १० किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यात विजय मिळवलाय. अन्य कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आली नाही.
वाचा-
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून धोनी चेन्नईचे नेतृत्व करत आहे. हैदराबादसह चेन्नईने सर्व संघांविरुद्ध १० पेक्षा अधिक सामने जिंकले आहेत. दिल्ली आणि बेंगळुरू विरुद्ध त्यांनी सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी १५ वेळा विजय मिळवला आहे. तर राजस्थानविरुद्ध १४, पंजाब आणि कोलकाता विरुद्ध प्रत्येकी १३ वेळा विजय मिळवला आहे. आयपीएलचे सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई विरुद्ध चेन्नईने १२ वेळा विजय मिळवला आहे.
वाचा-
प्रत्येक संघाविरुद्ध चेन्नईचे विजय
दिल्ली- १५ वेळा
बेंगळुरू- १५ वेळा
राजस्थान- १४ वेळा
पंजाब- १३ वेळा
कोलकाता- १३ वेळा
मुंबई- १२ वेळा
हैदराबाद- १० वेळा
या वर्षी चेन्नईची कामगिरी अपेक्षेनुसार होत नव्हती. त्यामुळे हैदराबादविरुद्धचा सामना हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता. या सामन्यात नाणेफेकचा कौल चेन्नईच्या बाजूने लागला आणि धोनीने गोष्टी स्वत:च्या बाजूने करण्यास सुरूवात केली. प्रथम फलंदाजी करत १६७ धावा उभ्या केल्या. नंतर ७ गोलंदाजांसह हैदराबादवर विजय मिळवत कमबॅक केले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times