आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान चारुलता यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोत भारतीय संघाचा कर्णधार सोबत त्या गप्पा मारत होत्या. ८६व्या वर्षी देखील त्या स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आल्या होत्या. याबद्दल सर्व जण त्यांच्या उत्साहाला आणि क्रिकेट प्रेमाला दाद देत होते. चारुलता यांचा उत्साह पाहून विराट कोहली आणि रोहित शर्मा अचंबित झाले होते.
वाचा-
चारुलता यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर त्यांच्या नातीने निधनाची बातमी दिली. माझ्या आजीचे १३ जानेवारी संध्याकाळी ५.३० वाजचा निधन झाले. ती आम्हाला सर्वात प्रिय होती, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
वाचा-
भारतीय क्रिकेट संघाच्या या मोठ्या चाहतीच्या निधनावर बीसीसीआयने शोक व्यक्त केला. बीसीसीआयने सोशल मीडियावर चारुलता आणि विराट कोहली यांचा गेल्या वर्षी वर्ल्ड कप दरम्यान घेतलेला फोटो शेअर केला आहे. टीम इंडियाची सुपर फॅन नेहमी आमच्या मनात असतील. क्रिकेटसाठी त्यांचे प्रेम आम्हाला नेहमी प्रोत्साहन देईल. त्यांच्या आत्मास शांती मिळो, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धचा साखळी सामना पाहण्यासाठी चारुलता आल्या होत्या. तेव्हा विराट कोहलीने त्यांना बांगलादेशविरुद्धच्या सामन्याचे तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते. इतक नव्हे तर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर विराट आणि रोहित यांनी चारुलता यांचे आशिर्वाद घेतले होते.
हे देखील वाचा-
Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News