दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर चेन्नईने हैदराबादपुढे विजयासाठी १६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. तसा हैदराबादचा संघ विजयाच्या जवळ पोहोचला होता. त्यांना ७ चेंडूत २२ धावांची गरज होती. राशिद खान चांगली फलंदाजी करत होता. त्याने आधीच्या ओव्हरमध्ये धमाकेदार फलंदाजी केली होती. १९व्या षटकात शार्दुल ठाकूरच्या अखेरच्या चेंडूवर त्याने लॉन्ग ऑनच्या वर चेंडू मारला आणि तेथे उभ्या असलेल्या दीपक चाहरने सोपा कॅच घेतला. पण कॅच घेतल्यानंतर दीपकने डोक्याला हात लावला. याचे कारण म्हणजे राशिद जेव्हा शॉट मारण्यास आला तेव्हा तो क्रिझच्या मागे आला आणि त्याचा पाय विकेटला लागला.
वाचा-
राशिदला हिट विकेट बाद देण्यात आले. एकाच चेंडूवर अगदी काही सेंकदाच्या अंतराने तो दोन वेळा बाद झाला.
वाचा-
चेन्नईने हैदराबादपुढे विजयासाठी १६८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या केन विल्यम्सनने अर्धशतक झळकावले होते. पण केन बाद झाल्यावर चेन्नईचा विजय सुकर झाला. त्यामुळे या सामन्याच चेन्नईला हैदराबादवर मात करता आली. या स्पर्धेतील चेन्नईचा हा तिसरा विजय ठरला. चेन्नईकडून यावेळी सर्वाधिक धावा शेन वॉटसनने केल्या, त्याला ४२ धावा करता आल्या. अंबाती रायुडूनेही यावेळी ४१ धावांची भर घातली. कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी अखेरच्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली. त्यामुळेच चेन्नईच्या संघाला हैराबादसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times