दुबई: च्या १३ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी अद्याप फार समाधानकारक नाही. मंगळवारी चेन्नईने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध २० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात महेंद्र सिंह धोनीचे नेतृत्व आणि रणनिती याचे कौतुक होत आहे. सामना झाल्यानंतरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वाचा-

आयपीएलच्या १३व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची आतापर्यंतची कामगिरी आणि धोनीचे अपयश याची बरीच चर्चा होत आहे. पण चेन्नईच्या प्रत्येक सामन्यानंतर मैदानावर एक वेगळ चित्र पाहायला मिळते. ते म्हणजे चेन्नईचा कर्णधार प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करत असतो.

वाचा-

काल हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील हेच चित्र पाहायला मिळाले. हैदराबादच्या काही खेळाडूंसोबत त्याचा अनुभव शेअर करताना दिसतोय. संबंधित खेळाडू त्याला काही शंका विचारत आहेत आणि त्यावर धोनी त्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहे. यासाठी धोनीचे भरपूर कौतुक होत आहे.

वाचा-

धोनी प्रियम गर्ग, शहबाज नदीमसह अन्य युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करताना दिसतोय. एका व्हिडिओत धोनी त्यांना फलंदाजी संदर्भात मार्गदर्शन करत आहे. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो अनेक जण शेअर करत आहेत आणि धोनीचे कौतुक करत आहेत. अर्थात असे करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात धोनी मयांक अग्रवाल आणि कर्णधार केएल राहुल यांच्यासोबत चर्चा करत होता. तेव्हा देखील व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here