दुबई: च्या १३व्या हंगामात संघाची आतापर्यंतची कामगिरी शानदार झाली आहे. सात पैकी ५ सामन्यात विजय मिळवून ते गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर आहेत. आज दिल्लीची लढत विरुद्ध होत आहे. पण संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. अनुभवी गोलंदाज अमित मिश्रा आणि इशांत शर्मा हे दोन खेळाडू आयपीएलमधून बाहेर झाल्यानंतर आता त्यांना आणखी एक धक्का बसला आहे.

वाचा-

दुखापतीमुळे मुंबई विरुद्ध झालेल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. त्याला हेमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. मुंबई विरुद्धच्या सामन्यानंतर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने तो एक आठवडा खेळू शकणार नाही असे सांगितले होते. यासंदर्भात पीटीआयने आयपीएलमधील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाकडून करार झालेल्या खेळाडूंचा वैद्यकीय अहवाल बीसीसीआयला पाठवणे बंधनकारक असते. या नुसार ऋषभ पंतचा मेडिकल रिपोर्ट बीसीसीआयला पाठवण्यात आला आहे. यानुसार त्याला ग्रेड वनची हेमस्ट्रिंग स्ट्रेन झाली आहे. त्यामुळे तो पुढील १० दिवस क्रिकेट खेळू शकणार नाही.

वाचा-

पुढील सामन्यासाठी पंत उपलब्ध नसल्याने दिल्ली संघासाठी मोठा धक्का मानले जात आहे. पंत संघात नसल्याने दिल्लीची लय बिघडू शकते. मुंबई विरुद्ध हेटमायरला देखील खेळू शकला नव्हता. दिल्लीकडे पंत वगळता अन्य कोणताही भारतीय विकेटकिपर नाही. मुंबईविरुद्ध एलेक्स कॅरीचा समावेश करण्यात आला होता.

वाचा-

राजस्थानविरुद्ध दिल्लीने साखळी सामन्यातील पहिली लढत जिंकली होती. तेव्हा दिल्लीने ४६ धावांनी विजय मिळवला होता. राजस्थानच्या संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण गुणतक्त्यात ते ७व्या स्थानावर आहेत. दिल्लीने हा सामना जिंकल्यास ते १२ गुण मिळवतील आणि प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकतील. तर राजस्थानसाठी एक पराभव प्लेऑफमध्ये जाण्यासाठी अनेक अडचणी निर्माण करू शकतात.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here