मुंबई: युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या () संघाने या वर्षी देखील धमाकेदार कामगिरी केली आहे. सात पैकी ५ सामन्यात विजय मिळवत त्यांनी गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले आहे. प्रत्येक सामन्यात मुंबई संघाची कामगिरी चांगली झाली आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सुपर ओव्हर मधील सामना वगळता मुंबईला अपयश आले नाही.

वाचा-

आयपीएलमध्ये दोन असे संघ आहेत ज्यांचे फॉलोअर्स अतिशय जास्त आणि कट्टर आहेत. चेन्नई संघाच्या प्रत्येक ट्विटमध्ये तामिळ भाषेचा काही ना काही संदर्भ येतो. तसेच मुंबई इंडियन्सचा देखील प्रयत्न असतो. काही दिवसांपूर्वी धवल कुलकर्णीची संपूर्ण मुलाखत मराठीतून मुंबई इंडियन्सने शेअर केली होती. या मुलाखतीत धवलने करोना व्हायरस काळातील अनुभव आणि दुबईतील आयपीएल सुरू होण्यापूर्वीची परिस्थती सांगितली होती.

वाचा-

मुंबई इंडियन्सचा असाच एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ( ) हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू जेसन बेहरनडॉर्फला () मराठी शिकवताना दिसतोय. सुर्यकुमार जेसनला काही मराठी वाक्य शिकवतो. जेसन दुसऱ्याच प्रयत्नात ती वाक्य मराठीत बोलतो. त्यानंतर जेसन मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासोबत जाऊन मराठीत संवाद साधतो.

वाचा-

जेसन पहिल्या प्रयत्नात चांगली मराठी बोलतो. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने गेले महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे २०२० रोजी शेअर केला होता. आता हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होतोय.

वाचा-

IPL 2020मधील मुंबई संघाची आतापर्यंतची कामगिरी
१) चेन्नई विरुद्ध ५ विकेटनी पराभव
२) कोलकातावर ५ विकेटनी विजय
३)सुपर ओव्हरमध्ये बेंगळुरूकडून पराभव
४)पंजाबविरुद्ध ४८ धावांनी विजय
५)हैदराबादवर ३४ धावांनी विजय
६)राजस्थानविरुद्ध ५७ धावांनी विजय
७)दिल्लीविरुद्ध ५ विकेटनी विजय

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here