गुणतालिकेत सध्याच्या घडीला दिल्लीचा संघ हा दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे त्यांनी राजस्थानला जर आज पराभूत केले तर त्यांना अव्वल स्थानावर जाण्याची नामी संधी असेल. त्याचबरोबर या आयपीएलमध्ये सर्वप्रथम १२ गुण पटकावण्याची संधीही दिल्लीला असेल. दुसरीकडे राजस्थआनचा संघ हा सहा गुणांसह सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे या सामन्यात त्यांनी जर विजय मिळवला तर नक्कीच गुणतालिकेत त्यांचे स्थान सुधारू शकते.
बेन स्टोक्स संघात आल्यामुळे राजस्थानचा संघ चांगला दिसत आहे. कारण स्टोक्स हा अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. पण दुसरीकडे राजस्थानचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि संजू सॅमसन हे दोघेही चांगल्या फॉर्मात नाहीत आणि हीच चिंता संघाला सतावत असेल. पण संघातील राहुल टेवाटिया हा चांगली कामगिरी करून संघाला विजय मिळवून देत आहेत. राजस्थानला या सामन्यात आपल्या फलंदाजीवर जास्त भर द्यावा लागले. त्याचबरोबर या सामन्यात अनुभवी रॉबिन उथप्पाला खेळवायचे की युवा यशस्वी जैस्वालला संधी द्यायची, हा निर्णयी संघाला घ्यावा लागणार आहे.
दिल्लीचा कामगिरी आतापर्यंत चांगली झाली आहे. पण यष्टीरक्षक रीषप पंतची दुखापत हा संघासाठी चिंतेचा विषय असेल. सलामीवीर शिखर धवन चांगल्या फॉर्मात आहे. पण अजिंक्य रहाणेला आजच्या सामन्यातही संधी मिळणार का, हे पाहावे लागेल. गोलंदाजीमध्ये कागिसो रबाडा, एनरीच नॉर्टजे आणि हर्षल पटेल चांगली गोलंदाजी करत आहेत. त्यांना अक्षर पटेल आणि आर. अश्विन यांची चांगली साथ मिळत आहे. फलंदाजीमध्ये पृथ्वी साव आणि श्रेयस अय्यर यांना कामगिरीमध्ये सातत्य राखणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times