दुबई: सध्याच्या घडीला आरसीबीचा कर्णधार विराट कोहली हा चांगलाच चर्चेत आला आहे. आरसीबीचा संघ चांगले विजय मिळवत असून कोहलीही सातत्याने चांगली फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण विराट कोहली काही खास गोष्टी आपल्या कीट बॅगमध्ये ठेवत असल्याचे आता समोर आले आहे. कोहलीच्या किट बॅगमध्ये नेमकं काय आसतं, या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

सध्याच्या घडीला एक व्हिडीओ क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाला आहे. विराटने यावेळी आपल्या काही खास गोष्टी चाहत्यांसमोर आणल्या आहेत. विराटनेच आपल्या चाहत्यांसाठी हा एक खास व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये कोहलीने आपल्या कीट बॅगमध्ये नेमकं काय असतं, याची माहिती दिली आहे.

कोहलीच्या कीट बॅगमध्ये त्याचे खास शूज असतात. हे शूज खासकरून कोहलीसाठीच बनवण्यात आलेले आहेत. कोहलीच्या पायांना आराम मिळावा, त्याचबरोबर त्याला कोणतीही दुखापत होऊ नये, यासाठी कंपनीने कोहलीसाठी खास शूज बनवलेले आहेत. त्याचबरोबर विराटच्या किट बॅगमध्ये तब्बल ११ ग्लोव्ह्जच्या जोडी असतात.

विराट कोहलीचे पॅडही कंपनीने फक्त त्याच्यासाठी बनवले आहेत. धावा घेत असताना कोहलीला जास्त त्रास होऊ नये, यासाठी हे खास पॅड बनवले गेले आहेत. विराट कोहली हा भारताकडून कसोटी सामना खेळणारा २६९वा खेळाडू ठरला होता. त्यामुळे कोहलीच्या मांडीला लावायच्या पॅडवर २६९ हा क्रमांक लिहिण्यात आलेला आहे. त्याचबरोबर काही बॅट्स आणि हेल्मेट्सही या किट बॅगमध्ये आहेत.

या आयपीएलच्या सुरुवातीला विराटला लय सापडली नव्हती. पण गेल्या काही सामन्यांमध्ये कोहली हा सातत्याने चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत झालेल्या सात सामन्यांमध्ये कोहलीने २५६ धावा केल्या आहे, यामध्ये दोन अर्धशतकांचाही समावेश आहे. आतापर्यंत आरसीबीने सात सामने खेळले आहेत. या सात सामन्यांमध्ये आरसीबीने पाच विजय मिळवले आहेत, तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे गुणतालिकेत कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ हा तिसऱ्या स्थानावर आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here