मुंबई: भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार, जागतीक क्रिकेटमध्ये टी-२०, आयसीसी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा एकमेव कर्णधार युगाचा अस्त झाल्याची चर्चा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने क्रिकेटपटूंसोबतचे वार्षिक करार गुरुवारी जाहीर केले आहेत. या करारातून महेंद्र सिंह धोनीला वगळण्यात आले.

इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला. या पराभवानंतर धोनी भारताकडून खेळला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. धोनीने काही दिवासांपूर्वी जानेवारी महिन्यात निवृत्तीसंदर्भात सांगू तसेच आपण यावर्षी आयपीएल स्पर्धा खेळणार असल्याचे सांगितले होते.

वाचा-

बीसीसीआयने गुरुवारी खेळाडूंसोबतचे वार्षिक करार जाहीर केले. या करारातून धोनीला वगळण्यात आले. बीसीसीआयने ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी क्रिकेटपटूंना देण्यात येणारे मानधन बीसीसीआयने जाहीर केले. याआधी धोनीचा समावेश ग्रेड ए (पाच कोटी)मध्ये होता. धोनी टीम इंडियाकडून ९ जुलै २००९ रोजी अखेरचा सामना खेळला आहे. इतक्या मोठ्या कालावधीतपासून धोनी क्रिकेट का खेळत नाही याचे कारण देखील अद्याप त्याने सांगितले नाही. धोनीला त्याच्या भविष्यातील योजनांविषयी देखील विचारण्यात आले होते पण त्यासंदर्भात तो काही बोलला नाही.

वाचा-

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे म्हटले होते. धोनी यापुढे टी-२० खेळेल. तसेच तो टी-२० वर्ल्ड कपसाठी उपलब्ध असेल असे असे शास्त्री म्हणाले होते.

धोनीने भारताकडून ९० कसोटी, ३५० वनडे आणि ९८ टी-२० सामने खेळले आहेत. या तिन्ही प्रकारात धोनीने १७ हजार धावा तर ८२९ विकेट घेतल्या आहेत.

वाचा-

बीसीसीआयने क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱ्या मानधनाचे ग्रेड ‘ए प्लस’, ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ असे चार प्रकार करण्यात आले आहेत. ‘ए प्लस’मध्ये असलेल्या क्रिकेटपटूंना ७ कोटी, ‘ए’ ग्रेडमधील खेळाडूंना ५ कोटी, ‘बी’ ग्रेडमधील खेळाडूंना ३ कोटी तर अखेरच्या ‘ग्रेड सी’मधील खेळाडूंना १ कोटी मानधन दिले जाईल.

वाचा-

‘ग्रेड ए प्लस’मध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, हिटमॅन रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. ‘ए ग्रेड’मध्ये आर.अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत यांचा समावेश करण्यात आला आहे.

वाचा-

‘ग्रेड बी’ मध्ये वृद्धीमान सहा, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या, मयांक अग्रवाल हे खेळाडू आहेत. तिसऱ्या म्हणजेच ‘ग्रेड सी’मध्ये केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पंड्या, हनुमान विहारी, शादुर ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here