आतापर्यंत दिल्लीच्या संघात तीन मुंबईच्या खेळाडूंना आपण पाहिले होते. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे हे मुंबईकर यापूर्वी संघाकडून खेळताना आपण पाहिले आहे. पण या सामन्यात मुंबईच्या तुषारला संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत स्थानिक सामन्यांमध्ये तुषारने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्याची निवड दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात केली होती.
तुषारने आतापर्यंत मुंबईसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर भारतीय अ संघाकडूनही तुषार खेळलेला आहे. त्यामुळे फार कमी वयात तुषारला चांगला अनुभव मिळालेला आहे. तुषार हा एक मध्यमगती गोलंदाज आहे, त्याचबरोबर तो डावखुरा फलंदाजही आहे. त्यामुळे संघाला जेव्हा गरज असेल तेव्हा तो गोलंदाजीबरोबर फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे दिल्लीच्या संघाने तुषारला संघात घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता तुषार या संधीचे सोने करतो का, हे पाहणे सर्वात महत्वाचे ठरणार आहे.
पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून झालेला पराभवाचा वचपा काढण्यासाठी आज राजस्थान रॉल्सचा संघ सज्ज झाला आहे. आतापर्यंत दिल्ली आणि राजस्थान यांच्यामध्ये एकूण २१ सामने झाले आहेत. या २१ सामन्यांपैकी दिल्लीने ११ लढती जिंकलेल्या आहेत, तर १० सामन्यांमध्ये राजस्थानने विजय मिळवला आहे. गुणतालिकेत सध्याच्या घडीला दिल्लीचा संघ हा दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे त्यांनी राजस्थानला जर आज पराभूत केले तर त्यांना अव्वल स्थानावर जाण्याची नामी संधी असेल. त्याचबरोबर या आयपीएलमध्ये सर्वप्रथम १२ गुण पटकावण्याची संधीही दिल्लीला असेल.
दिल्लीचा कामगिरी आतापर्यंत चांगली झाली आहे. पण यष्टीरक्षक रीषप पंतची दुखापत हा संघासाठी चिंतेचा विषय असेल. सलामीवीर शिखर धवन चांगल्या फॉर्मात आहे. पण अजिंक्य रहाणेला आजच्या सामन्यातही संधी मिळणार का, हे पाहावे लागेल. गोलंदाजीमध्ये कागिसो रबाडा, एनरीच नॉर्टजे आणि हर्षल पटेल चांगली गोलंदाजी करत आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times