दुबई: आयपीएलच्या १३व्या किंग्ज इलेव्हन पंजाबची कामगिरी अतिशय खराब झाली आहे. सात सामन्यापैकी त्यांना फक्त एकामध्येच विजय मिळवता आलाय. फक्त दोन गुणांसह ते गुणतक्त्यात अखेरच्या स्थानावर आहेत. संघाचा कर्णधार केएल राहुलने स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. तर त्याचा सलामीचा जोडीदार मयांक अग्रवालने दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्यात. पंजाबला प्लेऑफमध्ये जायचे असेल तर यापुढील प्रत्येक सामना जिंकावा लागले. हे अतिशय कठीण आव्हान स्विकारले आहे ते या स्फोटक फलंदाजने…

वाचा-

पंजाबचा पुढील सामना गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध होणार आहे. या सामन्याआधी चर्चा सुरू झाली आहे की गेलला संघात स्थान मिळेल. पहिल्या काही सामन्यात त्याचा समावेश अंतिम अकरा जणांच्यात केला नाही आणि जेव्हा तशी घेण्याचा विचार केला तेव्हा तो आजारी पडला. आता पंजाब संगाने सोशल मीडियावर गेल परतण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

वाचा-

त्यानंतर आता गेलचा एक व्हिडिओ पंजाब संघाने शेअर केला आहे. या व्हिडिओत ख्रिस गेल म्हणतो की, आता अधिक वेळ वाट पाहावे लागणार नाही. युनिवर्स बॉस परत येतोय. मला माहित आहे की तुम्ही गेलची वाट पाहत आहात, आता लवकरच मी परत येतोय.

वाचा-

गेल पुढे येवढेपण सांगितले की, गुणतक्त्यात भलेही आम्ही अखेरच्या स्थानावर असू. पण यापुढील सात सामन्यात आम्ही विजय मिळवू. मी सर्वांना सांगतोय की आत्मविश्वास ठेवा, आपण हे करू शकतो.

वाचा-

रॉयल चॅलेंजर्स विरुद्धच्या सामन्यात पंजाब संघातून खराब फॉर्ममध्ये असलेल्या ग्लेन मॅक्सवेलच्या बदली ख्रिस गेलला संधी मिळू शकते. मॅक्सवेलने आतापर्यंत झालेल्या ७ सामन्यात ५८ धावा केल्या आहेत. पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार गेल पुढील सामन्यात अंतिम ११ जणांच्यात नक्की असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here