दुबई : दिल्ली कॅपिटल्सच्या शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अर्धशशतके झळकावली. या दोघांनी यावेळी राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. धवन आणि अय्यर यांच्या अर्धशतकांच्या जोरावरच दिल्लीला राजस्थानपुढे १६२ धावांचे आव्हान ठेवता आले.

दिल्लीने आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण यावेळी दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. कारण पहिल्याच चेंडूवर त्यांना पृथ्वी शॉच्या रुपात मोठा धक्का बसला. त्यानंतर अजिंक्य रहाणे हा फलंदाजीला आला होता. पण अजिंक्यलहा या सामन्यातही मोठी खेळी साकारता आली नाही. अजिंक्यला या सामन्यात २ धावाच करता आल्या.

पृथ्वी आणि अजिंक्य हे दोन धक्के बसल्यावर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर फलंदाजीला आला. यावेळी धवन आणि अय्यर यांच्यामध्ये चांगली भागीदारी झाल्याचेही पाहायला मिळाले. या दोघांनी यावेळी तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली आणि संघाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. धवनने यावेळी अर्धशतकही झळकावले. पण अर्धशतक झळकावल्यावर धवनला जास्त काळ खेळपट्टीवर पाय रोवून फलंदाजी करता आली नाही. धवनने यावेळी ३३ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५७ धावांची खेळी साकारली. दिल्लीच्या संघातील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली.

धवन बाद झाल्यावर संघाची सर्व जबाबदारी श्रेयस अय्यरने आपल्या खांद्यावर घेतली. अय्यरने यावेळी षटकार लगावत आपले अर्धशतक साजरे केले. पण अर्धशतक झळकावल्यावर अय्यर जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही. अय्यरला यावेळी राजस्थानच्या कार्तिक त्यागीने जोफ्रा आर्चरकरवी झेलबाद केले. अय्यरने यावेळी ४३ चेंडूंत ३ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली. अय्यर बाद झाल्यावर मार्कस स्टॉइनिसला यावेळी धडाकेबाज फलंदाजी करता आली नाही. मार्कसला यावेळी १९ चेंडूंत १८ धावा करता आल्या. जर मार्कसने धडाकेबाज फलंदाजी केली असती तर दिल्लीचा संघा १७०-१८० धावांपर्यंत पोहोचू शकला असता, पण यावेळी मार्कस अपयशी ठरल्याचेच पाहायला मिळाले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here