मुंबई: भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज याच्यावर लंडन येथे ऑपरेशन करण्यात आले. भुवनेश्वरवर ११ जानेवारी रोजी हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले असून ते यशस्वी झाले. ऑपरेशननंतर भुवनेश्वर बेंगळुरू येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये दाखल झाल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सांगितले.

भुवनेश्वर पुन्हा कधी मैदानात दिसेल यासंदर्भात बीसीसीआयने निश्चित वेळ सांगितलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २९ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत भुवनेश्वर खेळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामात तो सनरायझर्स हैदाबादकडून खेळणार आहे.

वाचा-

हर्नियाच्या ऑपरेशनसाठी भुवनेश्वर ९ जानेवारी रोजी लंडनला गेले होता. ११ जानेवारी रोजी त्याच्यावर ऑपरेशन करण्यात आले. तो सध्या भारतीय संघाचे फिजियोथेरेपिस्ट योगेश परमार यांच्या देखरेखीखाली आहे.

वाचा-

दुखापतीमुळेच भुवनेश्वरचा न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी विचार करण्यात आला नव्हता. भुवनेश्वरने भारताकडून २१ कसोटी, ११४ वनडे आणि ४३ टी-२० सामने खेळले आहेत. डिसेंबर २०१९ वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भुवनेश्वरला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला हर्नियाचा त्रास असल्याचे निदान झाले.

गेल्या वर्षी त्याने ३३ वनडे सामन्यात ३३ विकेट तर १३ टी-२० सामन्यातून १८ विकेट घेतल्या होत्या.

वाचा-

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वरला दुखापत झाल्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. NCAने भुवनेश्वरला फिट असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्यानंतर तिसऱ्याच सामन्यात त्याच्या दुखापतीने डोकवर काढले होते.

दरम्यान, बीसीसीआयने पृथ्वी शॉ दुखापतीतून बाहेर आल्याचे सांगितले. न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय अ संघातून तो खेळणार आहे. पृथ्वीने त्याच्या सरावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. भारताचा अ संघ न्यूझीलंडमध्ये तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. वनडे मालिका २२ ते २६ दरम्यान होणार आहे. पहिली कसोटी ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी आणि दुसरी कसोटी ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान होईल.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here