दुबई: २०२० मधील आतापर्यंत सर्वात यशस्वी ठरलेला संघ म्हणजे () होय. बुधवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्लीने विजय मिळवला. हा त्यांचा स्पर्धतील सहावा विजय होय. १२ गुणांसह ते अव्वल स्थानी आहेत. दिल्ली संघाची आयपीएलच्या कोणत्याही हंगामातील ही सर्वोत्तम अशी कामगिरी म्हणावी लागेल. या वर्षी दिल्ली विजेतेपदाच्या शर्यतीत आहे इतकी त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. पण दिल्ली संघाला गेल्या काही दिवसांपासून नजर लागली आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे. जाणून घ्या कारण…

वाचा-

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात काल दिल्लीने विजय मिळवला असला तरी या सामन्यात संघाचा कर्णधार () जखमी झाला आहे. यामुळे तो मैदानाबाहेर होता. राजस्थानची फलंदाजी सुरू असताना पाचव्या षटकात बेन स्टोक्सने मारलेला चेंडू रोखण्याचा प्रयत्न करत असताना श्रेयस बडला आणि त्याने संघासाठी चौकार रोखला पण तो जखमी झाला आणि मैदान सोडावे लागले. श्रेयसची दुखापत लवकर बरी झाली नाही तर दिल्लीच्या पुढची वाटचाल अवघड होऊ शकते.

वाचा-

गेल्या काही दिवसांपासून खेळाडू जखमी होत असल्याने दिल्ली कॅपिटल्सची डोकेदुखी वाढत चालली आहे. या संघाने स्पर्धेत आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामाला सुरूवात झाली आणि दिल्लीचे काही खेळाडू जखमी झाले. यात फिरकीपटू अमित मिश्रा, जलद गोलदाजी इशांत शर्मा यांचा समावेश होता. इशांत तर संपूर्ण आयपीएलला मुकणार आहे. त्यानंतर ऋषभ पंत देखील जखमी झाला. तो १० दिवस सामने खेळू शकणार नाही.

अर्थात पंत फिट झाला तरी पुढील काही सामन्यात तो असणार नाही. आधीच महत्त्वाचे खेळाडू जखमी असताना आता कर्णधार देखील जखमी झाल्याने संघाची चिंता वाढली आहे.

वाचा-

बुधवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने ७ बाद १६१ धावसंख्या उभी केली होती. श्रेयस अय्यर मैदानाबाहेर गेल्याने शिखर धवनने नेतृत्व केले आणि पंजाबला १४८ धावांवर रोखले. अखेरच्या षटकात तुषार देशपांडेने दोन विकेट घेतल्या आणि राजस्थानचा पराभव केला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here