मुंबई: आयपीएलमध्ये काल (बुधवारी) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने () राजस्थान रॉयल्सवर ( ) विजय मिळवला. राजस्थानला अखेरच्या षटकात विजयासाठी २१ धावांची गरज होती आणि फलंदाजीला होता स्फोटक फलंदाज राहुल तेवतिया. दिल्लीकडून अखेरच्या षटकात गोलंदाजी दिली () या पदार्पण करणाऱ्या मुंबईच्या गोलंदाजाकडे…

तुषारने अखेरच्या षटकात फक्त ७ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. विशेष म्हणजे पदार्पणाच्या सामन्यात तुषारने बेन स्टोक्सची विकेट घेतली. तुषाने ४ षटकात ३७ धावा देत दोन विकेट घेतल्या. या कामगिरीनंतर तुषार स्टार झाला. त्याच्या पदार्पणातील कामगिरीवर सर्व जण खुश आहेत.

वाचा-

तुषारने जेव्हा क्रिकेट खेळण्याचे ठरवले होते तेव्हा त्याला फलंदाजी व्हायचे होते. यासाठी तो शिवाजी पार्क जिमखान्यावर आला. पण फलंदाजी करण्यासाठी मोठी रांग पाहिली आणि तो गोलंदाजीसाठीच्या रांगेत उभा राहिला. तुषारच्या त्या निर्णयावर कधीच वाइट वाटले नाही. कारण काल आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

वाचा-

तुषार म्हणाला, २००७ साली मी कल्याणहून माझ्या ३-४ मित्रांसह शिवाची पार्क जिमखान्यावर आलो होतो. तेव्हा फलंदाजीसाठी मोठी रांग दिसली. त्यात ४० ते ४५ खेळाड होते आणि २० ते २५ जण पॅड घालून तयार होते. तर गोलंदाजी करण्यासाठी फक्त १५ ते २० खेळाडू होते. दुपारचे साडेतीन झाले होते आणि निवड ६ ते साडेसहा पर्यंत होणार होती. मला वाटले की फलंदाजीच्या रांगेत उभा राहिलो तर संधी मिळणार नाही. मला रिकाम्या हाताने माघारी यायचे नव्हते. म्हणूनच मी गोलंदाजीच्या रांगेत उभा राहिलो.

वाचा-

तेव्हा मी एक सर्वसाधारण मुला प्रमाणे वेगाने गोलंदाजी करत होतो. गोलंदाजांसाठीची रांग अधिक वेगाने मोठी होत होती. जेव्हा माझा नंबर आले तेव्हा मला नवा चेंडू मिळाला. मी रन अप तयार केला आणि चेंडू टाकला. चांगला आउट स्विग झाला तो चेंडू. सर पद्माकर यांनी माझे कौतुक केले आणि म्हणाले, पुन्हा असाच चेंडू टाक. तेव्हा मला माहित देखील नव्हते की ते कोण आहेत. मी ६ ते ७ चेंडू टाकले आणि माझी निवड झाली.

तुषार लहानपणापासून दिल्लीचा कर्णधार (Shreyas Iyer) सोबत शिवाजी पार्कवर सराव करतोय. २००७ साली निवडीच्या वेळी मी पुढील काही दिवस अशीच गोलंदाजी केली आणि मग मी जिमखान्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला, मी एक जलद गोलंदाज झालो होतो.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here