नवी दिल्ली: फक्त सर्व सामान्य नाही तर सिनेस्टार आणि क्रिकेटपटू देखील अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे नेतृत्व करणाऱ्या कोहलीने सांगितले की तो पांढरे बूट का घालतो.

वाचा-

शारजामध्ये सुरू असलेल्या आयपीएल २०२० मध्ये शानदार कामगिरी करत आहे. इंग्लंडमधील फुटबॉल मॅनचेस्टर सिटीचे प्रशिक्षक पेप गुआर्डियोला यांच्या सोबत इस्टाग्राम लाइव्ह बोलताना विराट म्हणाला, पांढऱ्या बुटा सोबत खेळायला मला आवडते. विशेषत: फलंदाजी करताना. ही माझी अंधश्रद्धा आहे.

वाचा-

विराटने २००८ साली आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. लाइव्ह चॅटवर बोलताना विराट म्हणाला, जेव्हा मी फलंदाजी करतो तेव्हा माझा झोन असतो. तो काळ माझ्यासाठी सर्वात आवडता असतो.

वाचा-

विराटने गुआर्डियोला यांना बुटांबद्दल विचारले. त्यावर ते म्हणाले, मी जेव्हा खेळायचो तेव्हा काळ्या रंगाचे बूट वापरत होतो. आता काळे बूट मिळत नाहीत. जेव्हा मी लाल रंगाचे बूट वापरले तेव्हा मॅनेजर जॉन क्रायफ यांनी काळ्या रंगाचे बूट वापरण्यास सांगितले.

वाचा-
जखमी

प्रेक्षकांशिवाय होणारे सामने हे मैत्रीपूर्ण लढती सारख्या आहेत. पण गोष्टी थांबल्या नाही पाहिजे, आपल्याला खेळत राहिले पाहिजे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here